शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

397 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद; आज मतमोजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2022 21:54 IST

भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांतर्गत १९ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी थेट सरपंचपदासह १२२ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात एकट्या भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ७२, तर १२२ सदस्यपदासाठी ३२५ उमेदवार रिंगणात होते. १० सदस्य अविरोध निवडून आले आहेत. जिल्ह्यातील ६५ मतदार केंद्रांवर २८ हजार ५४० मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील चार तालुक्यांतर्गत १९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान रविवारी पार पडले. यात दोन केंद्रात ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड आल्याने सायंकाळी ७ वाजेपर्यंत मतदान झाले. एकंदरीत मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असून, सरपंचपदासह सदस्यांसाठीचे एकूण ३९७ उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम बंद झाले आहे. दरम्यान, सोमवारी १७ ऑक्टोबरला मतमोजणी केली जाणार आहे.भंडारा जिल्ह्यातील चार तालुक्यांतर्गत १९ ग्रामपंचायतींची निवडणूक घेण्यात येत आहे. त्याअंतर्गत रविवारी थेट सरपंचपदासह १२२ सदस्यांसाठी निवडणूक घेण्यात आली. यात एकट्या भंडारा तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी ७२, तर १२२ सदस्यपदासाठी ३२५ उमेदवार रिंगणात होते. १० सदस्य अविरोध निवडून आले आहेत.जिल्ह्यातील ६५ मतदार केंद्रांवर २८ हजार ५४० मतदार मतदानासाठी पात्र ठरले होते. त्यात १४ हजार ३६० पुरुष, तर १४ हजार १८० महिला मतदारांचा समावेश आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजेपासून मतदानाला प्रारंभ झाला. यात सकाळी ९.३० वाजेपर्यंत एकूण ९.६९ टक्के मतदान झाले होते. त्यानंतर हळूहळू मतदानाला वेग आला. सकाळी ११.३० वाजेपर्यंत २४.४९ टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मात्र मतदानाची गती वाढली. १.३० वाजेपर्यंत १९ ग्रामपंचायतींसाठी ४३.७५ टक्के मतदान झाले होते. भंडारा तालुक्यातील परसोडी येथे मशीनमध्ये बिघाड झाल्यामुळे रात्री ८ वाजतापर्यंत मतदान प्रक्रिया सुरू होती. सायंकाळच्या सुमारास या मतदान केंद्रावर चांगलीच गर्दी दिसून आली. दिव्यांग मतदारांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावला. दरम्यान सोमवारी कुणाला सरपंच पदाची लॉटरी व सदस्यपद लाभते याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत.

१७ हजार नागरिकांनी बजावला मतदानाचा हक्क- जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत रविवारी १७ हजारपेक्षा जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला. नोंदणी अंतर्गत ११ हजार ७२४ पुरूष तर ११ हजार ६०१ महिला मतदारांची नोंदणी करण्यात आली होती. त्यापैकी आठ हजार ८११ पुरूष व आठ हजार ५५६ महिला मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पुरूष मतदानाची टक्केवारी ७५.१५ तर महिलांच्या मतदानाची टक्केवारी ७३.७५ टक्के इतकी आहे. 

 

टॅग्स :EVM Machineएव्हीएम मशीनElectionनिवडणूक