शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण तलाव ठरताहेत जीवघेणे

By admin | Updated: August 7, 2014 23:45 IST

भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात परिचीत असला तरी अनेक तलावाच्या पाळी जीर्ण झाल्या आहेत. सिंदपुरी तलावांची मालकी व त्यावर नियंत्रण कुणाचे यात प्रशासनातच मतभिन्नता आहे.

भंडारा : भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा म्हणून राज्यात परिचीत असला तरी अनेक तलावाच्या पाळी जीर्ण झाल्या आहेत. सिंदपुरी तलावांची मालकी व त्यावर नियंत्रण कुणाचे यात प्रशासनातच मतभिन्नता आहे. निधींचा अभाव ही त्या-त्या विभागाची डोकेदुखी असली तरी जीर्ण तलावामुळे हे गाव मात्र जिवघेण्या स्थितीत असल्याचे वास्तव नाकारता येणारे नाही. सिंदपूरी येथे मागील आठवड्यात मालगुजारी तलावाची पाळ फूटून ६० ते ७० घरे पडली होती. ओलाव्यामुळे आणखी काही घरे पडण्याच्या स्थितीत आहेत. एकीकडे राज्याचे मुख्यमंत्री आपादग्रस्त तथा नैसर्गिक संकटप्रसंगी शासन खंबीरपणे उभा राहण्याची घोषणा करीत आहेत. दुसरीकडे सिंदपूरी येथे मानवनिर्मित चुका व दुर्लक्षामुळे ३९१ कुटुंबांचे गाव बाधित झाले. या गंभीर समस्येला जबाबदार कोण? असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत. सिंदपुरी गावापासून एक ते सव्वा कि.मी. अंतरावरील मालगुजारी तलाव आहे. शेतातीलच माती पाळीवर टाकण्यात आली. मातीची पाळ असलेल्या मोठ्या तलावाला सिमेंटचे अस्तरीकरण करण्याचा नियम आहे. जिथे मुरुमाची पाळ असते, तो तलाव सुरक्षित मानला जातो. परंतु तशी स्थिती याठिकाणी नाही.पश्चिचमेकडून शिरले पाणीतलावाची पाळ फुटल्यावर सर्वप्रथम सिंदपुरी गावाच्या पश्चिमेकडील शेतातून पाण्याचा लोंढा आला. गावातील दोन सख्खे वयोवृद्ध भाऊ शंकर व सदाशीव उरकुडे यांच्या घरामागे पाण्याने वेढा घातला. हे दोन भाऊ परिसरात राम-लक्ष्मण म्हणून परीचीत आहेत. सोबत राहण्याचा संकल्प घेतलेली ही भावंडे हलाखीच्या स्थितीत जगर आहेत. त्यांना घरकुल मिळाले. निराधार योजनेच्या मानधनावर त्यांचे जगणे सुरू आहे. यांच्यासारखेच गिरीसाव बिसने, बिसन मोडकू शहारे आणि त्यांची पत्नी सीताबाई हे सुद्धा यांचेही घर पडले असून पडक्या घरातच ते वास्तव्य करीत आहेत. शहारे यांच्या घरातील धान्य वाहून गेले. शिधापत्रिका नसल्यामुळे त्यांच्या उदरभरणाचा प्रश्न जटील झाला आहे.गरजू लाभापासून वंचितसिंदपुरी येथे तलावाच्या पाण्यामुळे घरे क्षतिग्रस्त झाले, अशा ग्रामस्थांची नावे मदतीच्या यादीत नाहीत तर ज्यांच्या घरांचे अल्प नुकसान झाले त्यांची नावे यादीत समाविष्ट करण्यात आल्याचा आरोप शिवराम हलमारे या वृद्धाने केला.वास्तव्यात अडचणीघरे पडलेले अथवा राहण्यायोग्य नसणारे ग्रामस्थ सध्या विष्णु मंदिर, हनुमान मंदिरात वास्तव्याला आहेत. सामूहीक भोजन व राहणे असल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. शौचालय समस्या आहे. मंदिरालगत शेतशिवार आहे. तिथे विषारी किटकांपासून धोका नाकारता येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणीघटनेनंतर जिल्हाधिकारी डॉ.माधवी खोडे यांनी तलावाला भेट देऊन समस्या जाणून घेतली. तहसीलदार व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना मदतीचे निर्देश दिले. जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीने ग्रामस्थांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु मदत न मिळाल्याने ग्रामस्थांत असंतोष कायम आहे.पालकमंत्री फिरकले नाहीभंडाऱ्याचे नवनियुक्त पालकमंत्री राजेंद्र मुळक चार दिवसापूर्वी येऊन अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पक्ष कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. परंतु सिंदपूरी येथील आपादग्रस्तांना व घटनास्थळाला भेट देण्याचे सौजन्य दाखविले नाही.