शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

मृत्यूनंतरही जोपासले रुग्णसेवेचे व्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2017 21:59 IST

विरली बु. जिवंत असेपर्यंत एखादी सेवा, व्रत जोपासले जातात. मात्र, येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. गंगाधर बागडे यांनी आपले आयुष्य रुग्णसेवेत घालविल्यानंतर नेत्रदानाचा संकल्प करून मृत्युनंतरही रुग्णसेवेचे .....

ठळक मुद्देबागडे यांचे नेत्रदान : समाजापुढे आदर्श

विरली (बु.) : विरली बु. जिवंत असेपर्यंत एखादी सेवा, व्रत जोपासले जातात. मात्र, येथील प्रसिद्ध आयुर्वेदाचार्य डॉ. गंगाधर बागडे यांनी आपले आयुष्य रुग्णसेवेत घालविल्यानंतर नेत्रदानाचा संकल्प करून मृत्युनंतरही रुग्णसेवेचे व्रत जोपासले. विशेष उल्लेखनीय म्हणजे त्यांच्या आई, वडील आणि कनिष्ठ बंधूनीही नेत्रदान केले होते.येथील डॉ. गंगाधर बागडे (६७) यांचे आज शनिवारला सकाळी दीर्घ आजाराने देहावसान झाले. त्यांनी आपली प्रकृती साथ देत नसल्याचे पाहून स्थानिक ग्रामायण प्रतिष्इानमार्फत मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला होता. त्यांच्या अंतिम इच्छेनुसार पुत्र दिपक आणि मिलिंद यांनी आपल्या वडिलांचे नेत्रदान केले. नेत्रदानाची प्रक्रिया नागपुरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या नेत्रपेढीतील नेत्रतज्ञांनी पार पाडली.ते गावात एक सेवाभावी डॉक्टर म्हणून सुपरिचित होते. रात्रीबेरात्री कोणत्याही गोरगरिबांच्या हाकेला हाक देवून धावून जाणारे गरिबांचे डॉक्टर म्हणून ते ओळखले जायचे. अशा या डॉक्टरांनी आयुष्यभर रुग्णसेवेचे व्रत जोपासले आहे.आता मृत्युनंतर दोन नेत्रबाधितांना त्यांच्या नेत्रांची सेवा मिळणार आहे. ते गावातील ग्रामीण युवक विकास प्रसारक मंडळाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक चळवळी उभारल्या होत्या, हे येथे उल्लेखनीय.विशेष उल्लेखनीय म्हणजे यापूर्वी डॉ. बागडे यांच्या मातोश्री सरस्वता, वडिल तुकाराम बागडे आणि कनिष्ठ बंधू व्यंकट बागडे यांनीही मरणोत्तर नेत्रदान केले होते. त्यामुळे डॉ. बागडे यांनी नेत्रदान करून आपल्या कुटूंबाचा वारसा पुढे चालविला आहे.