शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत १४० प्रकरणांचा जलदगतीने निपटारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 21:48 IST

आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत झिरो पेंडेंसी व डेली डिस्पोझल अभियानांतर्गत १४० प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात येथील जिल्हा परिषदेला यश आले आहे. गत वर्षापासून सुरु झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देआश्वासित प्रगती योजना : झिरो पेंडेंसी व डेली डिसपोजल अभियान

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आश्वासित प्रगती योजनेअंतर्गत झिरो पेंडेंसी व डेली डिस्पोझल अभियानांतर्गत १४० प्रकरणांचा जलद गतीने निपटारा करण्यात येथील जिल्हा परिषदेला यश आले आहे. गत वर्षापासून सुरु झालेल्या या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यात समाधान व्यक्त होत आहे.जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील कामात सुत्रता आणली जात आहे. त्यासाठी प्रलंबित प्रकरणाचा निपटारा जलदगतीने व्हावा यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात अभियान राबविले जात आहे. जिल्हा परिषदेच्या तब्बल अकरा विभागातून अधिकारी, कर्मचाºयांच्या सेवाविषयक प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी आश्वासित प्रगती योजनेच्या माध्यमातून धडक मोहिम राबविण्यात आली. यामुळे जिल्हा परिषदेच्या प्रशासन कार्याची गती वाढली तर याठिकाणी काम पूर्ण होण्याच्या आशेने येणारे नागरिकही समाधानी दिसत आहे. त्यांचे काम वेळेवर करण्यात येते. गत वर्षापासून सामान्य प्रशासन विभागाचा पुढाकारातून हा उपक्रम राबविला जात आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य) मंजूषा ठवकर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी विजय झिंगरे, वित्त व लेखा अधिकारी योगेश जाधव आणि जिल्हा परिषदेच्या विविध विभाग प्रमुखांचा समावेश असलेली समिती सेवाविषयक प्रकरणे तातडीने निकाली काढण्यासाठी कार्यरत आहे. सामान्य प्रशासन, पंचायत, महिला व बालकल्याण, आरोग्य, वित्त, सार्वजनिक बांधकाम, लघु पाटबंधारे, पशु संवर्धन, शिक्षण विभाग (प्राथमिक), कृषी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागामध्ये ही मोहिम राबविण्यात आली. या मोहिमेमध्ये प्रलबित प्रकरणांचा निपटारा जलदगतीने झाला. १४० प्रकरणे निकाली काढण्यात आली. जिल्हा परिषदेच्या या उपक्रमाचा अधिकारी कर्मचाऱ्यांसोबत सामान्य नागरिकांनाही फायदा होणार आहे.अधिकारी -कर्मचाऱ्यांमध्ये आनंदआश्वासित प्रगती योजनेच्या पहिल्या टप्प्यात मंजूर झालेली ११७ प्रकरणे व दुसऱ्या टप्प्यात मंजूर झालेली २३ असा एकुण १४० प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. सामान्य प्रशासन विभागाने अधिकारी कर्मचाऱ्यांची सेवाविषयक प्रकरणे निकाली काढली. त्यामुळे जिल्हापरिषदेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यात आनंद व्यक्त होत आहे.