शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी होणार समृद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2018 01:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत.यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. शेतकºयांना रब्बी ...

ठळक मुद्देविजय रहांगडाले : जलसंपदा विभागातर्फे ५.८४ कोटींच्या कामाचे भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शेतकरी समृद्ध होणार आहेत.यावर्षी अल्प पावसामुळे जिल्ह्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. शेतकºयांना रब्बी पीक लावण्यास शासनाने मनाई केल्यामुळे आ. विजय रहांगडाले यांनी शासनाकडे पाठपुरावा करुन शेतकºयांच्या शेतात पाणी जाण्यासाठी जुने कालवे दुरुस्ती तसेच कालव्यांची लांबी वाढविण्याची मागणी केली होती. त्यावर शासनाने मंजुरी देत ५ कोटी ८४ लाख रूपये मंजूर केलेले आहे.यामध्ये चिरेखनी लघू कालवा बांधकामाकरिता ३५ लाख, कवलेवाडा वितरिकेच्या २ उजवा लघू कालव्यांच्या बांधकामाकरिता २५ लाख, मुख्य कालवा व त्यावरील लघू कालव्याची तसेच तिरोडा वितरिका व त्यावरील लघूकालव्याच्या दुरुस्तीकरिता ४५ लाख, कवलेवाडा वितरिकेच्या ४ (डावा) लघू कालव्यांच्या बांधकामाकरिता १.१७ कोटी, मरारटोला-कवलेवाडा रस्त्यावरील व कवलेवाडा वितरिकेवरील लहान पुलाचे बांधकाम १० लाख, कवलेवाडा वितरिका व त्यातील लघू कालव्याची दुरुस्तीची कामे १५ लाख, खैरबंदा उर्ध्वनलिकेवर माती भरावयाच्या कामाकरिता २५ लाख, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या कळप्रांगणाच्या बांधकामासाठी १.८० कोटी, धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा-२ च्या बॅरेज मीटर रुमच्या बांधकामाकरिता ७० लाख, सालेबर्डी पुच्छ कालव्याच्या बांधकामाकरिता ३५ लाख, सालेबर्डी २ (उजवा) तिरोडा वितरिका व ११ (डावा) मुख्य कालव्याच्या दुरुस्तीच्या कामाकरिता १५ लाख, मुख्य कालव्यावरील मुंडीपार गावाजवळ दोन पुलांच्या दुरुस्तीच्या कामाकरिता ५ लाख, मुख्य कालव्याच्या ४ उजव्या कालव्यांवरील उपलघू कालव्यांचे उर्वरित बांधकामाकरिता ७ लाख रूपये आदी बांधकामांचा समावेश आहे.या सर्व बांधकामाचे भूमिपूजन आ. विजय रहांगडाले यांच्या हस्ते माजी आ. वैद्य यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. या वेळी कृउबास सभापती डॉ. ंिचंतामन रहांगडाले, उपसभापती विजय डिंकवार, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, सहायक अभियंता निखिल अहिरवार, उपअभियंता पंकज गेडाम, जि.प.सदस्य मनोज डोंगरे, पं.स. सदस्य डॉ. बी.एस. रहांगडाले, पवन पटले, कृउबास संचालक घनशाम पटले, पिंटू रहांगडाले, सरपंच किरण पारधी, गुलाब कटरे, वासुदेव हरिणखेडे, वनिता नागपुरे, प्रकाश भोंगाडे, विनोद लिल्हारे, सुनील अटराहे, योगशिला पारधी, अनिल मरस्कोल्हे, मंगला खेवले, स्वप्नील बन्सोड, जयसिंग उपासे व मोठ्या संख्येने गावकरी व संबंधित यंत्रणेचे कर्मचारी उपस्थित होते.