शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

कोंढा येथे उपबाजारात शेतकऱ्यांचे उन्हाळी धान उघड्यावर

By admin | Updated: June 6, 2017 00:23 IST

चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात सध्या शेतकऱ्यांचे उन्हाळी धान निघाले आहे.

मालाची प्रचंड हानी : गोडाऊन उभारण्याची मागणी, राजकीय पुढाऱ्यांच्या इच्छाशक्तीचा अभावलोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : चौरास भाग म्हणून ओळखणाऱ्या कोंढा परिसरात सध्या शेतकऱ्यांचे उन्हाळी धान निघाले आहे. ते विकण्यासाठी शेतकरी कोंढा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उपयार्डमध्ये नेत आहे. पण तेथे शेतकऱ्यांसाठी गोडाऊन नसल्याने धान उघड्यावर ठेवावे लागत आहे.कोंढा येथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र नाही. पवनी तालुक्यातील चौरास भाग म्हणून कोंढा परिसर आहे. या परिसरात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत. पण खरीप हंगामात घेतलेल्या धानासाठी व उन्हाळी धानासाठी आधारभूत केंद्र नाही. ही एक कोंढा परिसरासाठी शोकांतिका आहे. कोंढा येथे सर्वच पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आहेत. पण शासकीय आधारभूत केंद्र दोन वर्षापासून नाही. त्यामुळे सर्वांना चकारा (अड्याळ) येथे धान विकण्यासाठी न्यावे लागते. कोंढा येथे अनेक राईस मिल आहेत. तिथे शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु होऊ शकते. पण एकाही पुढाऱ्याची इच्छाशक्ती नाही. म्हणून शेतकऱ्यांना नाईलाजाने उपबाजार, कोंढा येथे तसेच व्यापाऱ्यांना धान विकावे लागते. शेतकरी अकाली पाऊस तसेच अनेक अस्मानी तर दुसरीकडे सुलताने माऱ्यामुळे मेटाकुटीला आला आहे. उन्हाळी धान पाण्याची सुविधा असणाऱ्यांनी अत्यल्प प्रमाणात पीक घेतले. कारण चौरास भागात पाण्याची पातळी खोल गेली असून सतत विजेचा लपंडाव सुरु आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांचे उन्हाळी धान पाण्याअभावी गेले आहे. अशा अवस्थेत अत्यल्प प्रमाणात उन्हाळी धान पीक निघाले तर त्याला सुरक्षीत ठेवण्याची सुविधा नाही. आधारभूत केंद्र कोंढा येथे नसल्याने शेतकऱ्यांनी आपले धान उपबाजार कोंढा येथे विकण्यासाठी आणले आहेत. सध्या उपबाजार कोंढा येथे उघड्यावर धान ठेवले आहे. पाऊस पडण्याचे दिवस असल्याने केव्हाही पाऊस पडल्यास उन्हाळी धान पिकांची नासाडी होऊ शकते. तेव्हा उपबाजार कोंढा येथे धान्य ठेवण्यासाठी गोडाऊनची गरज आहे.कोंढा उपबाजारात मालाची आवककृषी उत्पन्न बाजार समिती, पवनी अंतर्गत कोंढा येथे उपबाजार सुरु करण्यात आले. येथे वर्षभर सर्व खरीप व रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात आवक असते. पवनी तालुक्यातील सर्वात जास्त माल कोंढा येथे उपबाजारात येते. पण माल गोडाऊन नसल्याने उघड्यावर पडून असते. मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे धान्य उघड्यावर असल्याने चोरी होते. तसेच अचानक पाऊस पडल्यास मालाची प्रचंड हानी होते. तरी उपबाजार येथे शेतकऱ्यांच्या मालाला संरक्षण मिळावे यासाठी गोडाऊची व्यवस्था होणे गरजेचे आहे. यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती पवनी यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. सध्या उन्हाळी धान उघड्यावर पडले असून पावसाळा सुरु होणार आहे. तेव्हा धानाची नासाडी होण्याची मोठी शक्यता तेव्हा कोंढा येथील उपबाजार येथे गोडाऊन उभारण्याची मागणी अनेक शेतकऱ्यांनी केली आहे.