शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घरातीलच बियाण्याचा वापर करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:29 IST

भंडारा : येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन भंडारा ...

भंडारा : येत्या खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी स्वतःच्या घरी असलेले सोयाबीनचे बियाणे उगवण क्षमता तपासूनच पेरणीसाठी वापरावे, असे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बाजारात सद्यस्थितीत सोयाबीनचे भाव वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी दरवर्षी बियाणे बदलाची आवश्यकता नाही. एकदा प्रमाणित बियाणे वापरल्यानंतर त्याच्या उत्पादनातून येणारे बियाणे पुढील दोन वर्षांपर्यंत वापरता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडे खरीप हंगामातील राखून ठेवलेल्या घरातीलच सोयाबीन बियाण्यांचा वापर कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली करावा, असे सांगितले. कोरोना संसर्गाचा फटका सर्वच व्यवसायांना बसल्याने महागाईत वाढ झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी स्वतःकडील बियाणे वापरल्यास उत्पादन खर्च कमी होईल व प्रमाणित बियाण्यापासून उत्पादित झालेले सोयाबीन यावर्षी पेरणीसाठी वापरू शकतात. प्रमाणित बियाण्याच्या उत्पादनातून प्रतवारी करून चांगल्या प्रतीच्या सोयाबीनची बियाणे म्हणून निवड करावी. मात्र, हे करत असताना योग्य ती काळजी घ्यावी. सोयाबीनचे बियाणे अत्यंत नाजूक असते, त्याचे बाह्य आवरण पातळ असल्याने त्याची उगवण क्षमता अबाधित राखण्यासाठी बियाणे हाताळताना शेतकऱ्यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, कृषी मंडल अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली योग्य ती काळजी घ्यावी. बियाण्याची साठवणूक करताना आर्द्रतेचे प्रमाण १० ते १२ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसल्याची खात्री करावी. तसेच दरवर्षी बियाण्याची घरीच साठवणूक करताना प्लास्टिक पोत्यांचा वापर टाळावा, त्याऐवजी गोणपाटाची पोती वापरणे आवश्यक आहे. बियाण्याची साठवणूक करताना पोत्यांची थप्पी सात फुटांपेक्षा जास्त उंच राहणार नाही, याची दक्षता घ्यावी.

गतवर्षी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना सोयाबीनच्या काढणीवेळी शेतकरी मार्गदर्शन सभा, बैठकांमधून सोयाबीनची पूर्णच बियाणे विक्री न करण्याचे आवाहन केले होते. खरिपाच्या तोंडावर सोयाबीनचे भाव वाढले असले तरी शेतकऱ्यांनी बियाणे विक्री न करता पेरणीसाठी घरचे सोयाबीनच शिल्लक ठेवावे. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली बीज प्रक्रिया करून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी घरच्याच बियाण्याची उगवणशक्ती तपासण्याचे आवाहन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना केले आहे.

बॉक्स

उगवण क्षमता ७० टक्केपेक्षा जास्त असावी

शेतकऱ्यांनी आपल्या घरातील बियाणे पेरणीसाठी वापरण्यापूर्वी बियाण्याची उगवण क्षमता तपासावी. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता ७० टक्केपेक्षा जास्त असल्यास ते बियाणे पेरणीयोग्य असते. याशिवाय ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्यास सोयाबीनची पेरणी करावी. ही पेरणी करताना दोन ते चार सेंटीमीटर खोलीपर्यंत बियाणे जाईल, याची काळजी घ्यावी. पेरणी अगोदर प्रतिकिलो बियाण्याला तीन ग्रॅमची दोनशे ते अडीचशे ग्रॅम प्रति १० ते १५ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी तीन तास अगोदर बीजप्रक्रिया करून ते सावलीत वाळवावे. नंतरच त्याची पेरणी करावी. बियाणे हाताळताना बियाण्याची जास्त आदळआपट न करता कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली आधुनिक पद्धतीने लागवड करावी.

बॉक्स

बियाणे साठविण्याची योग्य पद्धत

स्वच्छ केलेले बियाणे चांगल्या नवीन गोणपाट वा पोत्यात साठवावे. मात्र, यासाठी प्लास्टिक पोत्यांचा वापर टाळावा. पोत्याची थप्पी ठेवताना थंड किंवा ओलावाविरहीत, हवा असलेल्या जागेत ठेवावी. सोयाबीन बियाणे हवेतील आर्द्रता लवकर शोषून घेते. जिल्ह्यात मागील खरीप हंगामात सोयाबीन पिकाच्या काढणीवेळी पाऊस झाल्याने काही प्रमाणात सोयाबीन बियाणे भिजले आहे. त्यामुळे सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी घरच्याघरी बियाण्याची आधी उगवणक्षमता तपासावी.