शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

दुग्ध व्यवसायातून शेतकऱ्यांनी आर्थिक स्थिती मजबूत करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2018 01:28 IST

आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.

ऑनलाईन लोकमततुमसर : आसमानी आणि सुलतानी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती अत्यंत कमजोर झाली आहे. यांना सावरण्यासाठी शेतकऱ्यांनी गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा असे प्रतिपादन पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपूरे यांनी केले.पंचायत समिती तुमसरच्या वतीने तालुकास्तरीय पशू प्रदर्शनी व गौपालकांच्या मेळाव्यात ते बोलत होते. माडगी येथे जिल्हा पशुसंवर्धन विभागाकडून शेतकऱ्यांसाठी मेळावा आयोजित केला होता. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य के.के. पंचबुद्धे, शुभांगी राहांगडाले, पं.स. सदस्य राजेंद्र ढबाले, पं.स. सदस्य कनपटे, पं.स. सदस्य शिशुपाल गौपाले, पशुसंवर्धन अधिकारी डॉ.चोपकर आदी उपस्थित होते.यावेळी नागपूरे यांनी, धानाची शेती करून शेतकरी स्पर्धेच्या युगात कुटुंबातील मुलांना चांगले शिक्षण, मुलींचे लग्न व आवश्यक गरजा कधीही पूर्ण करू शकत नाही. निसर्गामुळे व शासनाच्या शेतीविषयक चुकीच्या धोरणामुळे न्याय मिळणे अशक्य आहे. धानाची शेती परवडत नाही म्हणून शेतात ऊस लावले. पण कारखान्याकडून शेतकऱ्यांना वेळेवर ऊसाचे चुकारे मिळत नसल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी कर्जबाजारी झाले आहे. अशा परिस्थिती शेतकऱ्यांनी आधुनिक पद्धतीने गौपालन करून दुधाचा जोडधंदा करावा, असे प्रतिपादन त्यांनी केले. दुधापेक्षा बंद बॉटलचे पाणी महाग आहे. शासनाने दुधाचे भाव कमी करून दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. परदेशात शेतकऱ्यांकडून दूध खरेदीवर सरकार आधारमूल्यापेक्षा दर लिटर पाच रुपये अतिरिक्त भाव देते. त्याच धरतीवर महाराष्ट्र सरकारने दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना सुद्धा कमीत कमी चार रुपये अतिरिक्त भाव द्यावा अशी मागणी हिरालाल नागपुरे यांनी केली आहे.