शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांनी कमी खर्चाची पीक लागवड करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2019 21:26 IST

शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकºयांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.

ठळक मुद्देसंजय देशमुख : सिहोरा येथे शेतकऱ्यांसाठी कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा एक ज्वलंत व सामाजिक विषमता जाणवणारा विषय आहे. शेतकऱ्यांनी नगदी पिकासह कमी खर्चाची पीक लागवड करण्याकडे लक्ष देणे महत्वाचे आहे. असे प्रतिपादन जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी केले.सेंद्रीय शेती विषमुक्त उत्पादन व कायदेविषयक मार्गदर्शन कार्यक्रम एजिवासू प्रोडक्ट व वेस्ट क्यारिअर वेस्ट डिलच्या विद्यमानाने घेतलेल्या कार्यक्रमाला जिल्हा सत्र न्यायाधीश संजय देशमुख, जिल्हा विधी सेवाचे सचिव कोठारी, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद बानवाले, संजय एकापुरे, गौरीशंकर डोहळे, शेखर तिवारी, प्रभात मिश्रा, सतीष गाढवे, जयशंकर घटाळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सिहोरा येथे कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बहुसंख्येने शेतकरी उपस्थित होते. संजय देशमुख यांनी सिहोरा येथे नैसर्गिक शेतीकरिता मार्गदर्शन करताना शेतकरी बंधूंनी बियाणे, कीटकनाशके, खत घरीच तयार करून शेती करण्याचे आवाहन केले. आज शेतकरी अत्यंत वाईट परिस्थितीत जगत आहे. कोणीही शेती करण्यासाठी तयार नाही. कारण रासायनिक खते कीटकनाशके व बियाणे मजुरी वा खर्च उत्पादन च्या तुलनेत जास्त आहे. जीवामृत बिजामृत कीटकनाशके (ब्रम्हास्त्र, अग्नी अस्त्र) कसे बनवावे हे शेतकरी बंधूंना समजावून सांगितले व सर्व शेतकरी बंधूंना पत्रके देून सदैव तुमच्या सहकार्याकरिता आश्वासन दिले. गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष संजय एकापुरे यांनी शेतकरी बंधूंना भरपूर उत्पन्न घेण्यापेक्षा विषमुक्त उत्पन्न घेऊन सृदृढ भारत निर्मिणी करणे काळाची गरज आहे. देशी गाय प्रत्येक शेतकरी बंधूंच्या घरी असलीच पाहिजे व घरी सर्वांनी दुधाचे सेवन करून शेण व गोमुत्रापासून १० एकर शेती करू शकतो असे आवाहन केले. जर्सी व होलेस्टीनच्या गाईचा दुधाचा वापर टाळण्याचे आवाहन केले. विषमुक्त अन्न पिकवून देशात व विदेशात आपले धान्य विक्रीसाठी पाठविण्यासाठी दर्जेदार माल तयार करण्यास सांगितले. शेखर तिवारी यांनी शेतकºयांना मार्गदर्शन करून कमी खर्चात शेती करून दाखवू असे आवाहन केले.