शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

शेतकºयांनी नवीन तंत्रज्ञानाच्या आधारे शेती करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2017 00:14 IST

निसर्गाच्या बदलत्या युगात शेतीत नवनवे प्रयोग करणे गरज आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत असून शेतकºयांनी......

ठळक मुद्देनाना पटोले : संकल्प ते सिद्धी कार्यक्रमात शेतकºयांनी घेतली शपथ

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : निसर्गाच्या बदलत्या युगात शेतीत नवनवे प्रयोग करणे गरज आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत असून शेतकºयांनी पारंपारिक शेतीसोबतच आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीमध्ये प्रयोग करावेत व उत्पन्न दुप्पट होईल अशा पध्दतीचा अवलंब करावा, असे प्रतिपादन खासदार नाना पटोले यांनी केले. कृषि विज्ञान केंद्र व आत्मा भंडारा यांच्या संयुक्त विद्यमाने साकोली येथे आयोजित संकल्प ते सिद्धी या कार्यक्रमात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. परिणय फुके होते. तुमसर पंचायत समितीच्या सभापती कविता बनकर, तहसीलदार अरविंद हिंगे, नवेगाव नागझिरा प्रकल्पाचे उपसंचालक अमलेंद्रु पाठक, विभागीय कृषी सहसंचालक प्रज्ञा गोळघाटे, गटविकास अधिकारी तडस, उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे, तालुका कृषी अधिकारी पदमाकर गिदमारे, कृषी विज्ञान केंद्राच्या कार्यक्रम समन्वयक डॉ. उषा डोंगरवार, चौधरी, गेडाम व योगेश खिराळे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.संकल्प ते सिध्दी कार्यक्रमांतर्गत शेतकºयांनी सामुहिक शेतीचा संकल्प करुन गावनिहाय नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शेतीचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या संकल्पाबरोबरच पुरक व्यवसायाची साथ दिल्यास शेती उत्पन्नास वाढ होईल असे सांगून खासदार म्हणाले की, तंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास शेती अधिक फायदेशिर ठरु शकते.यावेळी बोलताना आमदार डॉ. परिणय फुके म्हणाले की, पावसाचे दिवस कमी झाल्याने शेतीच्या उत्पादनावर विपरित परिणाम होतांना दिसत आहे. अशा परिस्थितीत कमी पाण्यात अधिक उत्पादन हे सुत्र विकसित करण्याची गरज निर्माण झाली आहे. या दृष्टीने केंद्र सरकार पावले उचलत असून नवनवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने केलेली शेती फायदेशिर ठरु शकते.उपविभागीय कृषी अधिकारी लोखंडे यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजना, गोपीनाथ मुंडे, अपघात विमा योजना, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियान व इतर योजनांची माहिती दिली.कृषी पणन तज्ज्ञ यांनी उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सादरीकरणाद्वारे उपस्थित शेतकºयांना सात सुत्री कार्यक्रमाची माहिती दिली. यावेळी कृषी क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाºया कृषीभूषण शेतकरी शेषराव निखाडे, मंदाबाई गावळकर या शेतकºयांचा शाल, श्रीफळ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला. तसेच आत्मा अंतर्गत गणेशपूर शेतकरी उत्पादक कंपनी भंडारा व नवचैतन्य शेतकरी उत्पादक कंपनी, धारगाव यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या कार्यक्रमात शेतकºयांना तंत्रज्ञानाची माहिती होण्याकरीता कृषी प्रदर्शनाचे आयोजन करण्यत आले होते. यामध्ये कृषी विज्ञान केंद्र साकोली, आत्मा भंडारा, सप्तरंगी शेतकरी उत्पादक कंपनी विरलीखंदार आदींनी सहभाग घेतला होता.