शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

विजेच्या धक्क्याने शेतकरी जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 22:55 IST

शेतातील मोटारपंप चालू करताना विजेच्या धक्क्याने तरूण शेतकऱ्याचा जागीच बापाच्या नजरेसमोर मृत्यू झाला. ही घटना पालांदुरात मऱ्हेगाव कृषी फिडर अंतर्गत घडली. सोमवारला दुपारी १०.१५ च्या सुमारास स्वत:च्याच शेतात घटना घडली. संतोष वासुदेव हटवार (२४) रा. पालांदूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : शेतातील मोटारपंप चालू करताना विजेच्या धक्क्याने तरूण शेतकऱ्याचा जागीच बापाच्या नजरेसमोर मृत्यू झाला. ही घटना पालांदुरात मऱ्हेगाव कृषी फिडर अंतर्गत घडली. सोमवारला दुपारी १०.१५ च्या सुमारास स्वत:च्याच शेतात घटना घडली. संतोष वासुदेव हटवार (२४) रा. पालांदूर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे.संतोष हा उमदा शेतकरी होता. पावसाच्या लहरीपणामुळे पºह्यांना पाणी देण्याकतिरा बापासोबत शेतावर गेला. सिंगलफेस मधून मोटार सुरू करताना वायर संतोषच्या हाताला लागला. संतोष ओल्या शरीराने आल्याने व पायात चप्पल अथवा जुता नसल्याने विद्युत करंट लागून पडला. यात तो जागीच ठार झाला. तत्काळ शेजारील शेतकरी धावत आले. पण काही करण्याआधीच गतप्राण झाला. वाºयासारखी बातमी परिसरात पसरली. घटनास्थळी बघ्यांची एकच गर्दी उसळली.अशीच घटना शुक्रवारला मचारणा येथे घडून स्वप्नील घोनमोडे या विद्यार्थ्याचा करूण अंत झाला. चार दिवसाच्या अंतराने ही दुसरी घटना असल्याने शेतकरी वर्गात चिंता वाढली आहे. महावितरणच्या आशिर्वादाने मध्यरात्री शेतावर पंप सुरू करायला जावेच लागते. त्यामुळे शेतकरी वर्गात धडकी भरली आहे.