शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

मऱ्हेगाव कालव्याच्या बांधकामाने खराशीतील शेतकरी प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:22 IST

गत मार्च महिन्यापासून मरेगाव कॅनलवर गोसे खुर्द अंतर्गत बांधकाम जूनपर्यंत करण्यात आले. त्यावेळी प्रभावित शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना शेतकऱ्यांची अडचण ...

गत मार्च महिन्यापासून मरेगाव कॅनलवर गोसे खुर्द अंतर्गत बांधकाम जूनपर्यंत करण्यात आले. त्यावेळी प्रभावित शेतकऱ्यांनी संबंधित अभियंत्यांना शेतकऱ्यांची अडचण दाखवली. जाण्या-येण्याकरिता रस्ता व बांधांनातील पाणी निचऱ्यासाठी नैसर्गिक उतार अत्यंत आवश्यक आहेत. संबंधित अभियंत्यांना १७ मे रोजी आंबाडी येथे जाऊन लेखी निवेदनही देण्यात आले. लाखनीचे तहसीलदार मल्लिक विराणी यांनाही निवेदन देत समस्या उजागर केली. तहसीलदारांना बांधकाम करून देणार असल्याचे सांगितले गेले; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना सोयीचे होईल, असे काम न झाल्याने शेतकरी समस्येत आलेले आहेत.

पावसाचे दिवस असून, रोवणीसाठी प्रभावित शेतकरी तळमळत आहेत. मंगळवारला योगेश झलके या प्रभावित शेतकऱ्यांच्या शेतात एक नवे तीन ट्रॅक्टर चिखलात फसले. चिखलणी झालीच नाही. गावातील आणखी काही ट्रॅक्‍टर बोलावून एकमेकांच्या आधाराने ट्रॅक्टर चिखलातून काढण्यात आले. पावसाचे पाणी बांधानात अधिक झाल्यास नैसर्गिक उताराने निघण्याचा मार्ग बांधकाम कंपनीने करून दिलेला नाही. भ्रमणध्वनीवरून संबंधित कंपनीच्या अभियंत्यांना सांगितल्यास ''हो'' म्हणतात; मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या समक्ष काम होत नाही. ही मोठी समस्या खराशी येथील कॅनललगतच्या शेतकऱ्यांची झालेली आहे. शेतकरी सुमार अडचणीत आला असून, गोसे खुर्द अंतर्गत आंबाडी येथील अभियंता वर्गाने तत्काळ दखल घेण्याची गरज आहे.