शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कृषिपंपाच्या जोडणीसाठी शेतकऱ्यांची पायपीट

By admin | Updated: December 24, 2014 22:54 IST

नागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही.

संजय साठवणे - साकोलीनागपूर येथे हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजले आहे. या अधिवेशनात सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी नवनवीन पॅकेजची घोषणा करण्यात आली असली तरी शेतीसाठी लागणारी विज जोडणी शेतकऱ्यांच्या शेतात पोहचली नाही. त्यामुळे अनेक शेतकरी चिंतेत पडले आहेत. खरीप पिक तर गेलेच मात्र रबीचेही पीक विज पुरवठ्याअभावी जाणार का असा प्रश्न आता साकोली तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे. वर्षभरात साकोली तालुक्यातील सात शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याची माहिती राज्य शासनाला आहे. युती सरकारणे शेतकऱ्यांसाठी सात हजार कोटीचे पॅकेजची घोषणा केली. या पॅकेजचे शेतकऱ्यांनी स्वागत केले असली शेतकऱ्यांच्या नशिबी आलेल्या वनवासाचे काय, साकोली तालुक्यात ९६ गावे असून या तालुक्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय हा शेती आहे. येथे पारंपारिक पद्धतीने शेती केली जाते. साकोली तालुक्यात सिंचनाची सोय नसल्याने शेतकऱ्यांना निसर्गावरच अवलंबून राहावे लागते. तर ज्या शेतकऱ्यांजवळ वाटरपंपाची सोय आहे ते शेतकरी कसेबसे शेती करून उदरनिर्वाह करतात. ज्यांच्याजवळ सिंचनाची सोय नाही ते निसर्गावरच अवलंबून शेती करतात.यावर्षी निसर्गाने दगा दिल्याने खरीप पीक गेली. त्यामुळे आता रब्बी पिकावर शेतकऱ्यांची आशा आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी कर्ज काढून आपल्या शेतात विहीरी व बोरवेल केल्या व विजेसाठी वितरण कार्यालयाच्या चकरा मारतात. पैसे भरूनही विज कनेक्शन देण्यास टाळाटाळ केली जाते. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी रबी पिकासाठी पऱ्हे भरले असून रोवणीसाठी वीज जोडणीसाठी वाट पाहत आहेत. एकीकडे शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना व पॅकेजच्या रूपाने मदतीची घोषणा करते. मात्र अधिकारी व कर्मचारी या योजना शेतकऱ्यापर्यंत पोहचू देत नाही, ही विदारक परिस्थिती आत्महत्यासाठी भाग पाडते.