शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
3
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
4
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
5
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
6
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
7
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
8
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
9
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
10
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
11
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
12
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
13
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
14
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
15
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
16
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
17
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
18
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
19
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
20
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

मोबदल्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषण

By admin | Updated: March 22, 2017 00:25 IST

तालुक्यातील बेला या ठिकाणची शेती पिंडकेपार या गाव पुनर्वसनाकरिता संपादन प्रक्रियेमध्ये घेण्यात आली होती.

भंडारा : तालुक्यातील बेला या ठिकाणची शेती पिंडकेपार या गाव पुनर्वसनाकरिता संपादन प्रक्रियेमध्ये घेण्यात आली होती. या सर्व शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह शेतीवर होता. मात्र नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मोबदला मिळाला नाही. परिणामी या प्रकल्पग्रस्तांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे. या बेमुदत आमरण उपोषणाची अजूनपर्यंत जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार १ जानेवारी २०१४ पासून केंद्र शासनाने नवीन भूसंपादन कायदा अमलात आणला आहे. महाराष्ट्र राज्यासह संपूर्ण राज्यात हा कायदा लागू आहे. भूसंपादन अधिनियम १८९४ मधील तरतुदीनुसार कलम ११ मधील ३१ जानेवारी २०१३ व त्यापूर्वी घोषित करण्यात आलेल्या निवाड्याप्रमाणे मोबदला रक्कम सर्व संबंधितांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेली नाही. अशा स्थितीत कलम २४ च्या पत्रकानुसार कारवाई करणे बंधनकारक आहे. तसेच भूसंपादन अधिनियम १८९४ मधील कलम ४ च्या अधिसूचनेमध्ये नमूद केलेले सर्व हितसंबंधित नवीन कायद्याच्या तरतुदीप्रमाणे मोबदला मिळण्यास पात्र राहतील असेही नमूद केले आहे. जानेवारी २०१५ मध्ये नवीन भूसंपादन कायद्याची कलम २४ प्रमाणे मोबदला निर्धारित करण्यात आला होता, तो अत्यल्प होता. परिणामी ९० टक्के बाधीत शेतकऱ्यांनी मोबदला मान्य केला होता. न्यायालयीन प्रक्रियेमध्येही यामध्ये आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागला. परंतु शासनाच्या वतीने काढण्यात आलेली अधिसूचना न्यायालयाला कळविण्यात आलेली नाही. सर्व शेतकऱ्यांना जोपर्यंत नवीन कायद्याप्रमाणे मोबदला मिळत नाही तोपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला होता. सबब मंगळवारपासून या शेतकऱ्यांनी उपोषण सुरु केले आहे. निवेदनाच्या प्रतिलिपी राज्यपालांसह मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री आदींना पाठविण्यात आली आहे. उपोषण मंडपात आरती भिवगडे, शिला भिवगडे, डी.बी. कोचे, सुशिला कोचे, मुरलीधर वालदे, रिद्धीदेव कोटांगले, रुपा कोचे, राधिका भुरे, जयतुरा कोचे, सिंधू कोचे, गणेश भुरे, ताराबाई कोचे, बबीता कोचे, शोभा मते, रामा ठवकर, शैलेश कोटांगले आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)