शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
2
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
3
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
4
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
5
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
6
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
7
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
8
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
9
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
10
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
11
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
12
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
13
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
14
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
15
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
16
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
17
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
18
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
19
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
20
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!

शेतकऱ्यांनो, केवळ भातपिकावरच अवलंबून राहू नका

By admin | Updated: January 25, 2016 00:47 IST

भंडारा जिल्ह्यात ९५ टक्के शेतकरी हे भातपिकाची शेती करतात. दुर्देवाने कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो.

शेतकरी मेळावा : शुभांगी राहांगडाले यांचे आवाहन, मॉयल फाऊंडेशनचा उपक्रमतुमसर : भंडारा जिल्ह्यात ९५ टक्के शेतकरी हे भातपिकाची शेती करतात. दुर्देवाने कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळाचा सामना शेतकऱ्यांना करावा लागतो. त्यातही सततची नापिकी त्यामुळे शेतकरी आत्महत्येचा पर्याय निवडतो. परंतु आत्महत्या हे समस्येचे मुळ नाही. विपरीत परिस्थितीचा सामना करायचा असल्यास शेतकऱ्यांनी केवळ भातपिकारच अवलंबून न राहता विविध प्रकारची पर्यायी शेती करावी, असे प्रतिपादन जिल्हा परीषदेचे महिला व बालकल्याण सभापती शुभांगी राहांगडाले यांनी केले.मॉयल फाऊंडेशन द्वारा पुरस्कृत वायफ मित्र संस्थाद्वारे सामुदायीक विकास कार्यक्रमांतर्गत राजापूर येथे आयोजित शेतकरी मेळाव्याच्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी मॉयलचे अभिकर्ता व चिखला मॉयलचे उपमहाव्यवस्थापक किशोर चंद्रकार, व्यवस्थापक विकास परिदा, जैन इरिगेशन सिस्टीम जळगावचे प्रविण सिद्धभडी, पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ.राजेश वासनिक, तालुका कृषी अधिकारी एस.जी. उईके, डॉ.बी.एम. चोपकर, जिल्हा परीषद सदस्या संगीता सोनवाने, सरपंच रंजू मासुलकर, तोफलाल रहांगडाले, तेजराम देशमुख, उपसभापती शेखर कोतपल्लीवार, पंचायत समिती सदस्य शिशुपाल गौपाले, कल्पना टेकाम, रमला कठौते, कविता, शशीकला उईके, अंतकला कोडवते, इंदिरा वहिले, उमा सेनकपाट, दिलीप सोनवाने, ठाकचंद मुंगुसमारे, राजू तोलानी, अशोक राहांगडाले, सुरेश राहांगडाले आदी मंचकावर उपस्थित होते. याप्रसंगी शेतीविषयक, पशुधन, महिला सक्षमीकरण शाळा व अंगणवाडी विकासाअंतर्गत सुखसुविधा तसेच शेती विषयक अवजारे आदींचे वितरण करण्यात आले. त्यात विशेषत: शेतकऱ्यांच्या शेतीची माती परीक्षण करण्यात आली. त्याचप्रमाणे बायोगॅसचे वितरण, गोटफॉर्मची उभारणी व शाळेला खेळाच्या वस्तूंसह डेक्स बेंच, इलपिंग लॅपटॉप, प्रोजेक्टर आदी बायफ मित्र संस्थेतर्फे प्रदान करण्यात आले. मॉयल फॉउंडेशनने जवळपासच्या ११ गावांना दत्तक घेतले असून त्या गावातील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण व आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी बायफ व मित्र संस्था कार्यरत आहे. त्याच विकासात्मक कार्याचा भाग म्हणून राजापूर येथे ११ गावांचा शेतकरी मेळावा आयोजित केला गेला. प्रास्ताविक पवन पाटीदार यांनी केले. संचालन राजापूरचे उपसरपंच वसंत बिटलाये तर आभार प्रदर्शन महाप्रकाश परबते यांनी केले. कार्यक्रमाकरिता ग्रामपंचायत राजापुरचे पदाधिकारी कर्मचारी तसेच बायफ मित्र संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)