शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पीक विम्यापासून शेतकरी वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2017 00:30 IST

अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो.

विमा कंपनीने नाकारली आर्थिक मदत : चौकशी अहवाल धुडकावलाचुल्हाड (सिहोरा) : अवकाळी पावसाने पिकांची नासाडी झाल्यास भरपाई मिळावी यासाठी शेतकरी विमा काढत असतो. परंतु विमा कंपनी आर्थिक मदत धुडकावून लावत असल्याचा प्रकार रेगेंपार येथे उघडकीस आला आहे. वैनगंगा नदी काठावर असलेल्या रेंगेपार (पांजरा) येथील शेतकरी शंकर नागपुरे यांनी सन २०१६ सत्रात २ हेक्टर शेतीत धान पिकाची लागवड केली होती. धानाची कापणी केली. अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कापणी केलेल्या धानाची नासाडी झाली. या धान पिकाचे विमा कवच शेतकरी नागपुरे यांनी काढले होते. प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत त्यांनी पैसा जमा केला होता. दरम्यान आॅक्टोबर महिन्यात अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने कापण्यात आलेल्या धानाला कोंब फुटल्यामुळे धानाचे पीक हातात आले नाही. यासंदर्भात सिहोरा येथील जिल्हा बँकेला माहिती देण्यात आली. याशिवाय अवकाळी पावसाने नुकसान झाला असल्याचा पंचनामा शेत शिवारात धान पिकांचा पंचनामा तलाठी एम.एस. दुबे, ग्रामसेवक बी. एस. राठोड, कृषी सहायक पी.पी. खंडाईत आणि सरपंच कौशल नागपुरे यांच्या चमुने केला आहे. धान पिकांचा अवकाळी पावसाने नुकसन झाला असल्याचा अहवाल चमूने दिला. जिल्हा बँकेच्या सिहोरा शाखेने हा प्रस्ताव विमा कंपनीला पाठविला असता निर्णय घेण्यात आला नाही. यामुळे शेतकऱ्यांनी खासदार नाना पटोले यांचे जनता दरबार गाठले. सहा महिन्यानंतर पिक विमा कंपनीने सामुहिक शेतीचे नुकसान अशी अट लागू करीत आर्थिक मदत नाकारली आहे. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. गावात अन्य शेतकऱ्यांसोबत याही शेतकऱ्याला जोडण्यात आले आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमुने प्रस्तावित अहवाल तयार केला आहे. नुकसान झाला असता महिती दिल्यानंतरही विमा कपंनीचे अधिकारी शेत शिवारात पोहचले नाही. कर्मचाऱ्यांचा अहवाल ग्राह्य धरत नाही. यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. शेत शिवारात उत्पादीत पिकांचा सुरक्षीत कवच व शेतकरी आत्महत्या टाळण्यासाठी केंद्र व राज्य शासन योजना राबवित आहेत. पंरतु विमा कंपन्या शेतकऱ्यांसमोर अनेक भानगडी निर्माण करीत असल्याने शेतकरी विमा काढताना नाकारत आहेत. प्रशासकीय अधिकाऱ्यांचे चमूने अहवाल सादर केला असता विमा कंपनीने फेटाळून लावल्यामुळे शंकर नागपुरे हा शेतकरी पीक विमा योजनेच्या आर्थिक मदतीपासून वंचित ठरला आहे. (वार्ताहर)पीक विमा कंपनीकडे प्रस्ताव पाठविण्यात आला होता. विविध कारणांमुळे आर्थिक मदतीचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असून शेतकऱ्यांना माहिती देण्यात आली आहे.- मंगेश बोरकर, व्यवस्थापक जिल्हा बँक, सिहोरापीक विमा योजनेचा प्रस्ताव चमूने चौकशी करुन तयार केला होता. हा प्रस्ताव धुडकावल्याने अन्याय झाला आहे. न्यायासाठी ग्राहक मंचचा दरवाजा ठोठावणार आहे.- शंकर नागपुरे, नुकसानग्रस्त शेतकरी रेंगेपार