शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2018 23:54 IST

शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.

ठळक मुद्देनाना पटोले : पवनी येथे सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध

लोकमत न्यूज नेटवर्कपवनी : शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले.हनुमान जयंती उत्सव समितीच्या वतीने संताजी मंगल कार्यालय बेलघाटा वॉर्ड येथे आयोजित सर्वधर्मीय शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळा उद्घाटन समारंभाचे अध्यक्षीय भाषणातून ते बोलत होते.सोहळ्याचे उद्घाटन आ. अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विशेष अतिथी नगराध्यक्षा पुनम काटेखाये, मुख्याधिकारी माधुरी मडावी, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर, भंडारा अर्बन को बँकचे संचालक विलास काटेखाये, पं.स. सदस्य तोमेश्वर पंचभाई, आझाद शेतकरी संघटनेचे संस्थापक किशोर पंचभाई, पंकज रेवतकर तर प्रमुख अतिथी म्हणून न.प. उपाध्यक्ष कमलाकर रायपूरकर, नगरसेवक नरेश तलमले, प्रियंका जुमळे, शोभना गौरशेट्टीवार, निर्मला तलमले, अनुराधा बुराडे, वंदना नंदागवळी, डॉ. राजेश नंदूरकर, अ‍ॅड. लक्ष्मण देशमुख, देवा महाराज, दुधराम कळंबे, मोहन पंचभाई, अशोक पारधी, प्रशांत पिसे, राजेश राऊत उपस्थित होते.नाना पटोले म्हणाले,शेतकरी कर्जमाफी प्रकरणाबाबत शासन गंभीर नसल्याचे आरोप करून नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील सांडपाणी वैनगंगा नदीला सोडून स्वच्छ पाण्याला दूषित करण्याचे कृत्य निंदनीय आहे. दूषित पाणी वापरून शेतकरी कष्टाने कमावलेले पैसे वैद्यकीय उपचारावर खर्च करीत आहे. आता सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून शेतकºयांचे पाठीशी उभे राहिले पाहिजे.सामूहिक विवाह सोहळ्यात सात जोडपी विवाहबद्ध झाली. सर्व जोडप्यांना आमदार अ‍ॅड. अवसरे यांनी शिलाई मशीन, पंकज रेवतकर यांनी बाथरूम संच व राजेश राऊत यांनी ग्रामगिता भेट दिली.शेतकºयांचा वेळ व पैसा बचत करण्यासाठी जास्तीत जास्त पालकांनी त्यांच्या मुला-मुलींचे लग्न सामूहिक मेळाव्यात करावे, असे आवाहन आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. प्रास्ताविक संयोजक राजेश तलमले यांनी केले. संचालन ज्ञानेश्वर वाघमारे यांनी तर, आभार राजेश तलमले यांनी मानले. वºहांड्यासाठी उत्सव समितीच्या वतीने योजनाची व्यवस्था करण्यात आलेली होती.