शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
3
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
4
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
5
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
6
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
7
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
8
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
9
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
10
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
11
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
12
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
13
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
14
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
15
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
16
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
17
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
18
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
19
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
20
सिक्स बॉल चॅलेंज! नेटमध्ये धोनीने मारले गगनचुंबी षटकार, व्हिडीओ व्हायरल

नापिकीमुळे शेतकरी संकटात

By admin | Updated: November 4, 2014 22:36 IST

निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज चुकविण्यात कूंटुबाचे पालन पोषण करण्यात मोठी दमछाक होत आहे.

पालोरा (चौ): निसर्गाच्या लहरीपणामुळे मागील वर्षी ओला दुष्काळ तर या वर्षी कोरड्या दुष्काळाचे सावट आल्यामुळे शेतकऱ्यांनी कर्ज चुकविण्यात कूंटुबाचे पालन पोषण करण्यात मोठी दमछाक होत आहे. शेतकऱ्यांना दरवर्षी निसर्गाचा लहरीपणामुळे रडावे लागते. दरवर्षी तारेवरची कसरत करू न शेतकरी शेतातून पिक काढण्याच्या प्रयत्न करीत आहे. एकीकडे भारनियमन, जंगली जनावराचा हौदोस, पिकाला लागणारे विविध रोग रात्र दिवस एक करू न शेतकरी पिक काढण्याच्या प्रयत्नात असतो मात्र अखेरच्या क्षणी शेतकऱ्यांना काहीही मिळत नाही. दुसरीकडे प्रशासकीय सोसायटी, पतसंख्या, बॅक कर्ज भरण्याचा तगाता लावत आहे. आता शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याशिवाय काहीही पर्याय दिसत नाही हे बोलके चित्र परिसरात पाहायला मिळत आहे. मात्र प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेतल्या जात नाही.भंडारा जिल्हा हा धान पिकासाठी प्रसिध्द आहे. यात पवनी तालुका हा नंबर एकवर आहे. या तालुक्यात अनेक शेतकऱ्याकडे सिंचनाची सोय आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे. त्या शेतकऱ्यांनी यावर्षी सुरू वातीला पऱ्हे जगवून रोवणी केली. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे कोरडवाहू शेती आहे. त्यांचे पुर्वीपासूनच पाण्याअभावी पऱ्हे गेले. दुसऱ्यांदा पऱ्हे टाकण्यात आले. तेही पाण्याविना वारले होते. कसे तरी पऱ्हे जगवून रोवणी केली. थोडाफार पाणी येत असल्यामुळे महागडी रोजी असतांनी सुद्धा शेतकऱ्यांनी आशा न सोडता प्रयत्न सुरू ठेवले होते. अखेरच्या पाण्याने जोरदार हजेरी लावली लोकांनी महागडे खत मारले. मात्र शेवटी एका पाण्यासाठी शेकडो हेक्टर शेतातील धान पिक मरळ झाले. पुन्हा शेतकरी संकटात सापडला आहे. धानाचा २००० रू. भाव मिळावा म्हणून अनेक पुढाऱ्यापासून शेतकरी रस्त्यावर आंदोलने केलीत होती. प्रशासनाच्या हुकूमशाही पुढे कुणाचेही काहीही चालले नाही. आता अच्छे दिन येणार म्हणून शेतकऱ्यांपासून तर सामान्य जनता आनंदीत होती. यावर्षी शेतकऱ्यांना वरुणराजाने दगा दिल्याने परिस्थिती बिकट निर्माण झाली आहे. महागडे खत, औषधी, मजूरी सर्व खर्च जोडता प्रती एकराला १५ ते २० हजार रुपयाचा खर्च आला आहे. उत्पन्न मात्र दोन हजाराचे झाले नाही. अशा स्थितीत शेतकऱ्यांनी काय करावे असा प्रश्न पडत आहे. प्रशासकीय कर्मचारी पाहणी करीत नाही. आनेवारीची आकडेवारी भरघोस दाखविली जात आहे. परिस्थिती मात्र उलट आहे. आता या भागातीलच मुख्यमंत्री झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा निर्माण झाला आहे. प्रशासनाकडून शेतकऱ्यांना बोनस, कर्जमाफी मिळणार म्हणून अशी आशा आहे. संबधित प्रशासनाने याकडे लक्ष देऊ न धान पिकाला २००० रु. भाव द्यावा, अन्यथा पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल, अशी मागणी पवनी तालुक्यातील आझाद शेतकरी संघटनेचे अध्यक्ष किशोर पंचभाई यांनी केली आहे.आहे.(वार्ताहर)