शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

मुलींच्या विवाहासाठी शेतकऱ्यांना आधार

By admin | Updated: May 5, 2016 01:02 IST

सततची नापिकी, कर्जाचा डोंगर यामध्ये अडकलेला शेतकरी नैराश्यातून मृत्यूला कवटाळतो. या निराशेच्या गर्तेतून सावरण्यासाठी शासनाने शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजना सुरू केली आहे.

भंडारा : सततची नापिकी, कर्जाचा डोंगर यामध्ये अडकलेला शेतकरी नैराश्यातून मृत्यूला कवटाळतो. या निराशेच्या गर्तेतून सावरण्यासाठी शासनाने शुभमंगल नोंदणीकृत विवाह योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत विवाह करणाऱ्या प्रतिजोडप्यास १० हजारांचे अनुदान शासनातर्फे देण्यात येणार आहे.मुलीच्या लग्नाचा भार शेतकरी परिवारावर पडू नये, हा या योजनेचा मूळ उद्देश आहे. सामूहिक विवाह सोहळ्याची वाट न पाहता थेट नोंदणी कार्यालयात जाऊन विवाह करता येणार आहे.मुलीच्या लग्नासाठी अनेकदा कर्ज काढले जाते व निसर्गाची साथ नसल्यास नापिकी होऊन कर्जाचा डोंगर वाढतो व यामुळे नैराश्य आलेला शेतकरी आत्महत्या करतो, ही वस्तुस्थिती आहे. गरीब, गरजू शेतकरी, शेतमजूर यांच्यावर मुलींच्या विवाहाचा आर्थिक भार पडू नये, यासाठी शासनाने २००६ मध्ये विदर्भातील शेतकरी परिवारासाठी ही योजना सुरू केली होती. नंतर २००९ मध्ये राज्यातील शेतकरी व शेतमजूर कुटुंबासाठी ही योजना सुरू करण्यात आली. यामध्ये सुधारणा करून नवीन स्वरूपात शुभमंगल योजना शासनाने सुरू केली आहे. या योजनेमुळे वैयक्तिक स्वरूपाचा लाभ मिळणे शक्य झाले आहे. जिल्हा महिला व बालकल्याण विभागाच्या अधिनस्त ही योजना आहे. या विवाह योजनेत सहभागी होणाऱ्या अथवा सामूहिक विवाह सोहळ्यातील जोडप्याला १० हजारांचे अर्थसहाय्य मिळणार आहेत. विवाहोच्छुक दाम्पत्य स्वत:हून केव्हाही जवळच्या नोंदणी कार्यालयात नोंदणी करू शकतो व अनुदानास पात्र होऊ शकतात. (नगर प्रतिनिधी)कलापथक करणार जनजागृतीशेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासन वेळोवेळी उपाययोजना व जनजागृती करीत आहे. शासकीय योजनांची माहिती समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्यासाठी जिल्हा माहिती केंद्राच्या वतीने गावपातळीवर कला पथकांची निवड करण्यात येऊन शेतकऱ्यांना आत्महत्येपासून प्रवृत्त करण्यासाठी जनजागृती करणार आहे. या कलापथकातील कलावंत ग्रामीण भागात जाऊन पथनाट्य, लोकनृत्य, एकांकिका, भजन-कीर्तन, गोंधळ व सप्तखंजिरीच्या माध्यमातून जनजागृतीचे काम करणार आहेत. योजनेची वैशिष्ट्येअसे सोहळे तालुका पातळीवर आयोजित करावे.विवाह करणाऱ्या प्रत्येक जोडप्यास १० हजारांचे अनुदान.प्रतिजोडप्यामागे स्वयंसेवी संस्थेस २ हजारांचे अनुदानलाभार्थी वधूचे उत्पन्न एक लाखापेक्षा कमी असावे.अनुदान वधूच्या आईच्या खात्यावर जमा होईल.एका संस्थेला वर्षात २ सामूहिक विवाह सोहळे आयोजित करता येतील.सोहळ्यासाठी किमान ५, जास्तीत जास्त १०० दाम्पत्य.