शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

उसर्रा येथील शेतकरी मदतीपासून वंचित

By admin | Updated: July 2, 2015 00:47 IST

दि. १० जूनला रोजगार हमी योजनेच्या कामावर असताना लघुशंकेला गेलेल्या शेतमजूरावर रानडुकराने हल्ला केला.

उसर्रा : दि. १० जूनला रोजगार हमी योजनेच्या कामावर असताना लघुशंकेला गेलेल्या शेतमजूरावर रानडुकराने हल्ला केला. पण वनविभागाकडून अद्याप कुठलीही मदत मिळाली नसून शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत आहे.अशोक संपत चौधरी (४५) असे रानडुकराने हल्ला केलेल्या जखमीचे नाव आहे. उसर्रा येथे महाराष्ट्र रोजगार हमी योजनेचे काम सुरु होते. दिनांक १० जूनला मध्यान्तर सुटीनंतर सदर मजूर लघुशंकेसाठी झुडुपाखाली गेले असता झुडुपात दबा धरून बसलेल्या रानडुकराने हल्ला केला. त्यात अशोक चौधरी यांच्या डाव्या पायाला व कंबरेला जबर जखम झाली. त्यानंतर त्यांना तुमसर येथील सुभाषचंद्र बोस शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तुमसर पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील कारवाई साठी वनविभाग कांद्री तसेच आंधळगाव हद्दीतील घटना असल्याने आंधळगाव पोलिसात पुढील कारवाईसाठी पाठविण्यात आले असल्याचे जखमी इसमास सांगितले. पण २० दिवसांचा काळ होऊनही वनविभाग कांद्रीच्या अधिकाऱ्यांनी सदर घटनेचा साधा पंचनामा घेण्यात आला नसल्याने जखमी इसमाने कमालीचा संताप व्यक्त केला आहे.सदर जखमी इसमाच्या कुटुंबात कमावणारा एकच असल्याने त्यांच्या परिवाराचा उदरनिर्वाह कसा होणार? वनविभागाने नुकसान भरपाई देण्याची मागणी अशोक चौधरी यांनी केली आहे. (वार्ताहर)