शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्याने पेटविले धानपीक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2018 22:04 IST

सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली.

ठळक मुद्देखैरलांजी येथील घटना : सिंचनाअभावी घेतला निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : सिंचनाची अपुरी सोय, सततची नापिकी व निसर्गाचा लहरीपणा याला कंटाळून शेतकºयाने चक्क आपल्या अडीच एकरातील धानाला आग लावून पेटवून दिले. तालुक्यातील खैरलांजी येथे अरविंद राऊत यांनी शेतातील धानाला आग लावली.त्यामुळे जगाचा पोशींदा म्हटल्या जाणारा शेतकरी खरोखरच सुखी समृद्ध आहे काय, असा प्रश्न निर्माण होतो. मात्र शेतकºयांच्या प्रश्नाकडे शासन नेहमीच पाठ फिरवत असतो हे यावरून स्पष्ट होते.अरविंद राऊत रा. साकोली या शेतकºयाकडे खैरलांजी शिवारात अडीच एकर शेती आहे. या शेतकºयाकडे सिंचनाची सोय नसल्याने शेती ही निसर्गाच्या भरोशावरच करावी लागते. मागीलवर्षी राऊत यांनी हंगामात रोवणीसाठी पºहे पेरले होते. मात्र पाऊसच आला नाही.त्यामुळे रोवणी करू शकला नाही व पºहे तसेच उन्हाने करपले. यावर्षी हीच परिस्थिती येऊ नये व पैसे वाया जाऊ नये म्हणून या शेतकºयाने यावर्षी आवत्या पद्धतीने शेतात घाणाची लागवट केली.त्यावेळी पाऊस समाधानकारक होता. त्यामुळे शेत धानाने बहरून आले होते. या धानासाठी राऊत यांनी दोनदा खत दिले, एकदा औषध फवारणी केले, निंदन काढले यात त्यांचे जवळपास २० ते २५ हजार रूपये खर्च झाले.मात्र सिंचनाची सोय नसलयामुळे व एका पाण्यासाठी निसर्गाने धोका दिल्याने राऊत याचे हाती आलेले पीक गेले. ऐन निसण्याच्यावेळी धान वाळले. शेवटी झालेला खर्च वाया गेला. आज सकाळी राऊत यांनी या संपूर्ण अडीच एकरातील धानाला आग लावून टाकली. त्यावेळी त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या.