शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमणाचे विळख्यात तलाव

By admin | Updated: March 28, 2017 00:19 IST

भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे.

नियोजनाचा अभाव : मत्स्य उत्पादनावर विपरित परिणाम, लोकप्रतिनिधी लक्ष देतील काय?अशोक पारधी पवनी भंडारा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. पवनी तालुक्यात सुद्धा तलावांची संख्या फार जास्त आहे. नगरपालिका क्षेत्रात जिल्हा परिषद मालकीचे तलाव आहे. त्यासर्व तलावावर सभोवताल लोकांनी अतिक्रमण केलेले आहे. भोईतलाव, बालसमुद्र व कुऱ्हाडा असे तीन महत्वाचे तलाव पालिका क्षेत्रात आहेत. तीनही तलाव अतिक्रमणाचे विळख्यात जखडलेले आहेत.भाईतलाव वॉर्डात असलेले भाईतलाव हे तलाव जिल्हा परीषदच्या मालकीचे आहे. लक्षावधी रूपये खर्च करून शासनाने रोजगार निर्मिती करून तलावाचे खोलीकरण केले. मत्स्य उत्पादनासाठी तलाव वापरात आहे. गेल्या १० वर्षापूर्वी तलाव सर्व बाजूने दिसत होते. आता मात्र पाळीवर चढल्यानंतर सभोवताल अतिक्रमण झालेले तलाव पाहता येते. सर्व बाजूला अतिक्रमण असल्याने तलावात पाणीसाठा वाढवू शकत नाही त्याचा परिणाम मत्स्य उत्पादनावर होत आहे. प्रसिद्ध असलेल्या परकोटाचे पायथ्याशी बालसमुद्र नावाचे तलाव आहे. एका बाजूला पुरातन असलेली मातीची भिंत (टेकडी) म्हणजेच तलावाची पाळ आहे. दुसऱ्या बाजुला जगन्नाथ मंदीर, चंद्रमनी विहार व पर्यटन संकूल आहे. उर्वरित दोन बाजूवर लोकांनी अतिक्रमण केलेले आहे.पवनी-निलज रस्त्याचे बाजुला प्रसिद्ध असलेले कुऱ्हाडा तलाव. तलावाचे पाळीवर लोकांनी राहत्या घरासाठी व लहान लहान उद्योगासाठी अतिक्रमण केलेले आहे. तलावाची दुसरी बाजू म्हणजे बस्तरवारी व बेलघाटा वॉर्ड. या भागात लोकांनी रहाण्यासाठी घर बांधताना तलावाचे मोकळ्या जागेचा पुरेपूर वापर करून घेतलेला आहे. या तलावाचे खोलीकरणासाठी शासनाने लक्षावधी रूपये खर्च केले. परंतू पाणीसाठा वाढविण्यासाठी खोलीकरणाचा उपयोग झालेला नाही. कारण जिथे पाणी पसरावा अशाच ठिकाणी अतिक्रमण करून लोकांनी घर बांधलेले आहेत. भरघोष मत्स्य उत्पादनासाठी हा तलाव प्रसिद्ध आहे. प्रशासनाने अतिक्रमण हटविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे, असे न केल्यास भविष्यात तलावाचा पाणीसाठा कमी होवून त्याचा मत्स्य उत्पादनावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे.