शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

जगभरात बाबासाहेब आंबेडकरांची कीर्ती महान

By admin | Updated: February 4, 2016 00:44 IST

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुन्या रूढी, परंपरा विरूद्ध एल्गार पुकारून मानवाला मानवाची ओळख निर्माण करून दिली.

भंडारा : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जुन्या रूढी, परंपरा विरूद्ध एल्गार पुकारून मानवाला मानवाची ओळख निर्माण करून दिली. अंधश्रद्धेने गुरफटलेल्या नागरिकांना वैज्ञानिक धम्म दाखविला. त्यांची अंमलबजावणी करणे आज काळाची गरज निर्माण झाली आहे. बाबासाहेब आंबेडकर यांची किर्ती महान आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय तथा विशेष सहाय मंत्री इंजि. राजकुमार बडोले यांनी केले.बोधिचेतीय संस्थान चिखली (हमेशा) राजेगाव एमआयडीसी खुटसावरी मार्गावरील पर्यटन व निसर्गरम्य स्थळी आयोजित बौद्ध भिक्षु डॉ. भदंत आनंद कौसल्यायन यांची १११ वी जयंती, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १२५ वा जयंती पर्व व क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे अनावरण कार्यक्रमाचे आयोजन रविवारी करण्यात आले. या कार्यक्रमांच्या उद््घाटन कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक म्हणून ते बोलत होते. त्यांनी बाबासाहेबांच्या दिल्ली, लंडन, मुंबई येथील निवासस्थानाची महती पटवून धम्मचक्राला गती द्या, असे आवाहन केले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. संपत खिल्लारी, तहसिलदार सुशांत बन्सोडे, भीम कौशल चंद्रबोधी पाटील, गजेंद्र गजभिये, प्रा. वासंती सरदार, इंजि. जगदिश येळे, अ‍ॅड. एकनाथ रामटेके, भदंत वण्णा स्वामी, भदंत सत्यशील, भदंत संघरत्न माणके आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक, संचालन व आभार संस्थेचे अध्यक्ष डॉ. भदंत धम्मदीप महाथेरो यांनी केले.तत्पूर्वी पंचशील ध्वजारोहण करून खुटसावरी मार्गाने धम्मरॅली काढण्यात आली. या रॅलीचा समारोप बोधिचेतीय विहारात करण्यात आली. धम्मध्वजाला गजेंद्र गजभिये यांनी मानवंदना दिली. त्यानंतर प्रशिक बुद्ध भीम गायन मंडळ यशवंत ग्राम चिचटोला येथील चमुंनी स्वागत गीत गायन केले. तसेच नृत्य करून स्वागत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या स्मारकासाठी दिलेल्या दानदात्यांचा स्मृतीचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. रात्रीला 'भीमरायाची सावली' या धार्मिक नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमासाठी सुष्मा वासनिक, आदेश बांबोडे, चांगुना कांबळे, चित्रलेखा मेश्राम, यशोधरा खोब्रागडे, अर्चना खोब्रागडे, रत्नमाला वासनिक, मालती गडकरी, उज्वला बोरकर, रचना वैद्य, संगिता हुमणे, सुरेश बोरकर, द्वारका कानेकर, शुक्रतारा गजभिये, लता उके, कविता पाटील, कुंदा बारसागडे, रेशमा बोरकर, मालन गोंडान्ने, पार्वती गायकवाड, पुरूषोत्तम तिरपुडे, कला बांबोडे, विमल तिरपुडे, विनोद बोरकर, धमेंद्र बडोले, ईश्वर शेंडे, मंगेश शेंडे, निखिल हुमणे आदींनी सहकार्य केले. (नगर प्रतिनिधी)