शहरं
Join us  
Trending Stories
1
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
2
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
3
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
4
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
5
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
6
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
7
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
8
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
9
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
10
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
11
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
12
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
13
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
14
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
15
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
16
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
17
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
18
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
19
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
20
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...

ग्राहकांच्या रकमेची अफरातफर

By admin | Updated: September 8, 2015 00:35 IST

शासकीय कर्मचारी असो किंवा मोलमजुरी करून पोट भरणारा मजूर तो आपली जमा पुंजी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून जमा करून ठेवतो.

अड्याळ : शासकीय कर्मचारी असो किंवा मोलमजुरी करून पोट भरणारा मजूर तो आपली जमा पुंजी आपल्या मुलांच्या भविष्याचा विचार करून जमा करून ठेवतो. अड्याळ पोष्ट कार्यालयातील एका मुलीच्या खात्यातून ८२ हजार रुपयाची अफरातफर करण्यात आली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. अड्याळ येथील स्व.वसंतराव देशमुख हे पोष्ट विभागात पोस्ट मास्तर म्हणून कार्यरत होते. त्यामुळे त्यांचा जमापुंजीचा व्यवहार हा बँकेपेक्षा पोस्टाचीच अधिक होता. त्यांचा सर्व मुलीच्या नावाने पोष्टात काही रक्कम जमा करून ठेवली होती. त्यातील रुपालीच्या नावाने ३०८४०३ या खाते क्रमांकावर २०१० मध्ये ९२ हजार रुपये जमा केले होते. सदर रकमेवर व्याज लावण्यासाठी २०१२ मध्ये कार्यरत असलेल्या किनाके नामक अधिकाऱ्याकडे खाते पुस्तीका दिली होती. पुस्तीका परत आणण्यासाठी गेले असता पुस्तक हरविली असून नवीन पुस्तक बनवून देतो असे सांगून सहा सात महिन्याचा वेळ मारून नेला. त्यानंतर पुस्तक तयार करून दिली.दोन महिन्यापूर्वी पुस्तकावर व्याज चढविण्यासाठी पोष्ट कार्यालयात खातेपुस्तीका दिली असता खात्यावर एकही रक्कम नाही. असे सध्या कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनी सांगितल्यानंतर खातेधारकाला धक्काच बसला. याची प्राथमिक चौकशी केली असता सदर खात्यावरून २०१२ मध्ये मे, जून, जुलै मध्ये ३३५ हजार, ३७ हजार व २० हजार रुपये काढण्यात आले व पुन्हा ३१ जानेवारी २०१३ मध्ये २७ हजार रुपये जमा करण्यात आले असल्याचे निदर्शनास आले. सदर खात्यावरून कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी कुठल्याही व्यवहार केला नसल्याने सदर रकमेची अफरातफर करण्यात आल्याची शंका निर्माण झाली. याची चौकशी भंडारा येथील मुख्य कार्यालयात केली असता सदर रक्कम खातेदाराच्या नावाने नकली स्वाक्षरीच्या आधारे काढण्यात आली. तसेच ज्या वाऊचर रक्कम काढण्यात आली त्यावर दोन तीन प्रकारच्या चुका दिसून आल्याने रक्कम त्यावेळी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनीच काढली असावी, असा संशय बळावला आहे. (वार्ताहर)सदर प्रकरण उघडकीस आले. एस.एस. किन्नाके यांच्या कार्यकाळातील प्रकरण आहे. सध्या ते तिरोडा येथे कार्यरत आहेत. दोषींवर दंडात्मक कारवाई होऊन ग्राहकाला न्याय मिळाला पाहिजे.- एस.एम. राऊतसब पोष्ट मास्तर, अड्याळ