शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

मातेच्या चितेला मुखाग्नी देऊन मुलीनी फेडले पांग

By admin | Updated: June 16, 2016 00:49 IST

'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' असे म्हटले जाते. पोटचा मुलगा जर कुपुत्र निघाला तर त्याला काय म्हणावे, ...

मातेचा जीव जाताच मुलगा पसार : अंत्यविधीची प्रक्रिया पार पाडून घडविला आदर्शराहुल भुतांगे तुमसर'स्वामी तिन्ही जगाचा, आईविना भिकारी' असे म्हटले जाते. पोटचा मुलगा जर कुपुत्र निघाला तर त्याला काय म्हणावे, असाच काहीसा प्रकार तुमसरात घडला. वृद्ध आईचा सांभाळ करणे तर दूरच तिच्या चितेलाही तो मुखाग्नी न देताच त्याने पळ काढला. त्यामुळे तिच्या मुलीनेच अंत्यविधीची सर्व प्रक्रिया आटोपून चितेला मुखाग्नी दिला. मातृत्वाचे पांग फेडून आदर्श घडविला. शांताबाई लखाजी किरपाने (७६) रा. माकडे नगर, तुमसर यांना तीन मुली व एक मुलगा आहे. तीन मुलीपैकी एक मुलगी आधीच मरण पावल्याने पुष्पा व सुशीला या दोन मुली व देवराव नावाचा असा परिवारासह शांताबाई मालकीच्या घरात राहत होत्या. दरम्यान मुलगा मुलाचे लग्न झाल्यानंतर त्याने आई व बहिणीसोबत काडीमोड घेऊन त्याच घरातील दुसऱ्या खोलीत वेगळी चुल मांडली. देवरावने आई व बहीनींकडे दुर्लक्ष केल्याने शांताबाईच्या पुष्पा व सुशीला या मुली बोहल्यावर चढू शकल्या नाही.आता लग्नच करायचे नाही, असा निर्धार करून त्या दोघेही आईचा सांभाळ करीत राहिल्या. तीन महिन्यापासून वृद्धापकाळामुळे शांताबाई या आजारी पडली. तेव्हा पुष्पा व सुशीलाने जमेल तेवढे औषधोपचार करून काळजी घेतली. १२ जूनला रात्री शांताबाईचा मृत्यू झाला. आईचा मृत्यू झाल्याने मुलीची रडारड सुरू झाली. आई गेल्याची कुणकुण लागताच देवरावने रात्रीच बायको मुलासह घरून पळ काढल्याचे पहाटे समजले. त्यामुळे आईच्या अंत्येष्टीचा प्रश्न मुलीसमोर उभा राहिला. अशातच त्या मुलींना वॉर्डातीलच काही समाजसेवकांनी धीर दिला व तुम्हीच तिचे मुले आहात त्यामुळे तुम्हीच अंत्येष्टी करा असा सल्ला दिला. त्यानुसार पुष्पा व सुशीलानेही आईच्या मृत्यूचे दु:ख पचवित आईची अंत्येष्टी आपणच करणार असल्याचा निर्धार केला व आईच्या तिरडीला खांदा दिला. पार्थिवाला मुखाग्नी देऊन मुली मुलापेक्षा कमी नसल्याचे तुमसरकरांना पहावयास मिळाले.