न्याय्य मागण्यांसाठी : एप्रिल महिन्यापासूनचे थकीत मानधन व एप्रिल २०१४ पासून वाढीव मानधन लागू करण्यात यावे. या मागणीला घेऊन सोमवारी दुपारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी-बालवाडी कर्मचारी युनियन भंडारा (आयटक) व हिंद मजदूर सभा यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा नेण्यात आला. यावेळी संघटनेचे नेतृत्व दिलीप उटाने, युवराज उके, सविता लुटे व क्रिष्णाबाई भानारकर यांनी केले. शेवटच्या क्षणी शेकडो अंगणवाडी सेविका व मदतनिसांना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.
न्याय्य मागण्यांसाठी
By admin | Updated: September 29, 2015 02:06 IST