शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
6
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
7
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
8
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
9
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
10
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
11
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
12
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
13
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
14
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
15
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
16
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
17
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

निराधार योजना ठरतेय डोकेदुखी

By admin | Updated: June 4, 2015 00:34 IST

समाजातील दारिद्र्य रेषेखालील घटक तसेच निराधारांना हातभार लावण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध

पायपीट : बँकांची उदासीनता कारणीभूततुमसर : समाजातील दारिद्र्य रेषेखालील घटक तसेच निराधारांना हातभार लावण्यासाठी राज्य व केंद्र शासनाकडून विविध योजनेमधून आर्थिक मदत केली जाते. परंतु ही मदत लाभार्थ्यांना डोकेदुखी ठरत आहे. मदतीची रक्कम मिळविताना लाभार्थ्यांना मोठी दमछाक करावी लागत आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांच्या अडवणुकीच्या धोरणामुळे वेळेवर पैसे मिळत नाही. वारंवार हेलपाटे मारावे लागत असल्याने लाभार्थ्यांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.राज्य व केंद्र शासनाकडून अपंग, विधवा व वृद्ध व्यक्तींसाठी संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विकलांग योजना व श्रावण बाळ वृद्धापकाळ योजना अशा विविध योजना शासनाने सुरु केल्या आहेत. या योजनेमार्फत प्रत्येक लाभार्थ्याला साधारणत: ६०० रुपये दरमहा अनुदान दिले जाते. यात राज्य शासनाने ४०० तर केंद्र शासनाचे २०० असे मिळून ६०० रुपये अनुदान दिले जाते. राज्य शासन पेंशन टपाल कार्यालयामार्फत तर केंद्र शासनाकडून येणारे अनुदान राष्ट्रीयकृत बँकामार्फत मिळते. टपाल कार्यालयाकडून दिले जाणारे अनुदान मिळण्यास विलंब होत नाही. परंतु बँकाकडून दिल्या जाणाऱ्या अनुदानासाठी लाभार्थ्यांना मोठा संघर्ष करावा लागत आहे. बँकांमध्ये वारंवार हेलपाटे मारूनही अनुदान वेळेवर मिळत नाही. विशेषत: ग्रामीण भागातील बँकांबाबत लाभार्थ्यांचा अनुभव वाईट आहे. लिंक फेल आहे. पुरावे जोडा असे विविध कारणे समोर केली जात आहे. त्यामुळे बँकात चकरा मारूनही लाभार्थ्यांच्या हातात काहीच मिळत नसल्याने संताप व्यक्त केल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)बँकांच्या दृष्टिकोनात बदल व्हावाशेतकऱ्यांची कर्जप्रकरणे, शासनाच्या विविध योजनांची अनुदाने व इतर कामाचा बोजा यामुळे निराधार अनुदान योजनाच्या लाभार्थ्यांना शेवटच्या स्थानावर फेकल्यासारखे चित्र आहे. यात एखाद्या लाभार्थ्यांचे बँक कर्ज असेल तर ते अनुदानही त्याला दिले जात नाही. कर्जातच कपात केली जात आहे.यामुळे निराधार योजनेचे लाभार्थी अनुदानापासून उपेक्षितच राहत आहे.