लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जिल्ह्यातील नामवंत कारखाना असलेल्या अशोक लेलँड भंडारा (गडेगांव) येथे कंत्राटी कामगारांची संघटना भंडारा जिल्हा(इंजि.) कामगार संघ भंडारा व कंत्राटदार यांच्यामध्ये मुख्य मालक, जनरल मॅनेजर यांच्या संमतीने करार करण्यात आला. करार झाल्याने परिसरातील कामगारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.करारामध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतनाच्यावरती दहा टक्के वाढ व ३ हजार ८१२ रूपयाची वाढ मासीक पगारात करण्यात आली आहे. ती वाढ सेवाजेष्ठ यादीप्रमाणे वर्षावार वितरीत करण्यात आली आहे. करारामध्ये कामगाराच्या हिताचे रक्षण करण्यात आले आहे. कामगारांना ५ टक्के घरभाडे भत्ता, नियमाप्रमाणे २० दिवसावर एक पगारी सुट्टी, बोनस, राष्ट्रीय सणाच्या ४ पगारी सुट्टया, सणाच्या ४ पगारी सुट्टया वर्षातून एकूण कामगारांना ८ सुट्टया पगारी देण्यात येणार आहेत. उपहारगृहामध्ये सबसिडीवर चहा, नास्ता, जेवण मिळणार आहे. वर्षातून २ युनिफार्म, १ जोडी जुते, स्वेटर, जरकिन मिळणार आहेत.या व्यतिरिक्त कामगारांच्या आरोग्य व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वर्षातून एकदा नि:शुल्क मेडीकल चेकअप होणार आहे. कारखाना परिसरात असलेल्या दवाखान्यांमध्ये मोफत सोय मिळणार आहे. कामगार व त्यांच्या कुटूंबाचा विमा काढण्यात आला आहे.कंत्राटी कामगारांना ए.बी.सी. ग्रेड प्रमाणे वेतनाचे वाटप होणार आहे. किमान वेतन अधिनियमाप्रमाणे दर ६ महिन्यात येणारा स्पशेल अलाऊंस शासकीय नियमाप्रमाणे देण्यात येणार आहे. कराराचे फायदे १ जुलै २0१७ पासून सर्व कंत्राटी कामगारांना लागू होणार आहे.कंत्राटी कामगारांसाठी धडपडणारे भंडारा जिल्हा (इंजि.) कामगार संघाचे अध्यक्ष श्रीकात पंचबुध्दे यांचे सर्व कामगारांनी आभार मानले आहे.कंत्राटी कामगारांना जीवन सरुळीत जगता यावे, त्यांच्या आर्थीक, पारिवारीक व सामाजिक गरजा पूर्ण व्हाव्यात, कामगारांना समाजात जीवन सन्मानाने जगता यावे या दृष्टीकोनातून भंडारा जिल्हा (इंजि.) कामगार संघटनेचे प्रयत्न राहीले आहेत.कंत्राटी कामगारांसाठी करार व्हावा यासाठी भंडारा जिल्हा (इंजि.) कामगार संघाचे अयक्ष श्रीकांत पंचबुध्दे, उपाध्यक्ष पुरूषोत्तम नन्हारे, महासचिव संजय कोचे, सहसचिव सुभाष गजभिये, कोषाध्यक्ष नितीन बुरडे, संजय बडोले, भुपेश नंदेश्वर, विनोद वाढई, विकास रामटेके, सतिश लांजेवार व व्यवस्थापनातर्फे मुख्य मालकाच्या भुमिकेत असलेल्या जनरल मॅनेजर एम.एन.लखोटे, मॅनेजर अरविंद बोराडकर, मदन देशमुख, रेखाटे, रचना मित्तल व सर्व कंत्राटदार यांनी पुढाकाराने हा करार करण्यात आला.
कंत्राटी कामगारांना मिळणार सुविधा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 23:25 IST
जिल्ह्यातील नामवंत कारखाना असलेल्या अशोक लेलँड भंडारा (गडेगांव) येथे कंत्राटी कामगारांची संघटना भंडारा....
कंत्राटी कामगारांना मिळणार सुविधा
ठळक मुद्देकामगार संघ - कंत्राटदारांमध्ये करार : सर्वसंमतीमुळे कामगारांमध्ये उत्साह