शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शिक्षकांनी कालसंगत ज्ञानसमृद्ध व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 23:47 IST

नाविण्यपूर्ण पिढी घडवून आणण्याची क्षमता प्रत्येक शिक्षकांमध्ये आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे.

ठळक मुद्देकृष्णा मोरे : अविरत प्रशिक्षण, ९२ शिक्षकांचा सहभाग

ऑनलाईन लोकमत मोहाडी : नाविण्यपूर्ण पिढी घडवून आणण्याची क्षमता प्रत्येक शिक्षकांमध्ये आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांमधील परिवर्तन घडवून आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्नांची गरज आहे. बदलत्या काळातील विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेत प्रत्येक शिक्षकांनी गतीने ज्ञानसमृद्धी केली जावी असे प्रतिपादन मोहाडी पंचायत समितीचे गट विकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी केले.पंचायत समिती मोहाडीच्या सभागृहात सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास प्रशिक्षण अविरत या नावाने आयोजित करण्यात आले होते. अविरत प्रशिक्षणाचे उद्घाटन गटविकास अधिकारी कृष्णा मोरे यांनी केले. त्यावेळी ते बोलत होते. मंचावर गट शिक्षणाधिकारी रमेश गाढवे, मुख्याध्यापक दयाळनाथ माळवे, यशोदा येळणे, प्रकाश करणकोटे, हिंमत तायडे, वसंत मारवाडे, राज्यतज्ञ मार्गदर्शक राजकुमार बांते, श्रीराम काळे यांची मंचावर उपस्थिती होती. दोन दिवस चाललेल्या प्रशिक्षणात सातत्यपूर्ण व्यावसायीक विकास प्रशिक्षणाची उद्दिष्टे स्पष्ट करणारा अविरत व्हीडीओ दाखविण्यात आला. यामुळे विकास प्रशिक्षण कसे होणार हे समजण्यात आले.प्रशिणाबाबत शंकाचे निरसण करण्यात आले. उपस्थित शिक्षक व मुख्याध्यापकांनी स्वत:बद्दल बलस्थान व सुधारणा करायची गरज याबाबत माहिती दिली. शिक्षकांची प्रेरणा कमी झाली काय याबाबत त्याची कारणे यावर चर्चा झाली. प्रशिक्षणार्थीकडून प्रेरणा प्रश्नावली सोडविण्यात आली. किशोरवयीन विद्यार्थ्यांबरोबर शिक्षक म्हणून काम करताना जाणविणाºया समस्यांवर गटचर्चा करण्यात आली. स्व. विकास व कलारसास्वाद या पुस्तकातील विषय व त्याची गरज यावर चर्चा घडवून आणण्यात आली. तसेच महाकरिअर मित्र पोर्टलची ओळख करून देण्यात आली.या पोर्टलचा व कल चाचणीचा विद्यार्थ्यांना व शिक्षकांना कसा फायदा होऊ शकेल यावर चर्चा करण्यात आली. यावेळी तज्ज्ञ मार्गदर्शक राजकुमार बांते, श्रीराम काळे यांच्यासह मुकरण कुर्जेकर, संजय वासनिक यांनीही मार्गदर्शन केले. विविध गटचर्चेत वर्षा देशभ्रतार, यशोदा येळणे, हिंमत तायडे, प्रकाश करणकोटे, अतुल बारई, दयालनाथ माळवे यांनी भाग घेतला. प्रशिक्षणाचे समारोप गट शिक्षणाधिकारी रमेश गाढवे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आला.