शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
3
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना 'इमर्जन्सी' अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
4
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
5
"जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
6
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
7
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
8
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
9
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
10
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
11
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
12
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
13
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
14
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
15
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
16
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
17
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
18
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
19
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
20
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
Daily Top 2Weekly Top 5

वाहनांमध्ये तीव्र फोकस लाईटचा नियमबाह्य वापर

By admin | Updated: July 7, 2015 00:40 IST

शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येक जण आपल्या वाहनात काही वेगळे असावे याकडे लक्ष देतात.

अपघाताची शक्यता : वाहतूक विभागाने कारवाई करण्याची मागणी भंडारा : शहरातील वाहनांची वाढती संख्या बघता प्रत्येक जण आपल्या वाहनात काही वेगळे असावे याकडे लक्ष देतात. याच हेतूने अनेक जण नियमांचे उल्लंघन करून डोळे दिपविणारे पांढरे हेडलाईट लावत आहेत. परंतु ते इतरांसाठी जीवघेणे ठरत आहेत. रात्रीच्या अंधारात समोरून येणाऱ्या वाहनाचे पांढरे हेडलाईट डोळ्यावर पडल्याने अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. परंतु असे लाईट्स असलेली वाहने शहरात सर्रास धावत असतानाही या वाहनांवर अद्यापही कारवाई होताना दिसत नाही. शहरात दिवसभर हजारो वाहनांची वर्दळ सुरू असते. तसेच काही अन्य शहरातील वाहनेसुद्धा शहरात दाखल होतात. यामध्ये काही वाहनांना प्रखर असे पांढरे हेडलाईट असल्याचे निदर्शनास येते. पांढरा प्रकाश समोरून येणाऱ्या वाहन चालकांच्या डोळयावर पडत असल्याने वाहन चालकांना काहीच दिसत नसल्याने जागीच थांबावे लागते. अशावेळी अपघातही होतात. या प्रकारच्या घटनांमध्ये नागरिक तक्रारसुद्धा करीत नाही. अपघात होताच वाहन चालक पळूनही जातात. म्हणून या प्रकारचा उलगडा होत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे इतर वाहनचालक नेहमीच नाराजी व्यक्त करीत असतात.शहरामध्ये आलेली बाहेरील वाहने तसेच शहरामधील काही विद्यार्थी मोटारसायकलीला सर्रासपणे पांढरे हेडलाईट लावत आहेत. असे असतानाही वाहतूक शाखेकडून अद्यापही अशा कोणत्याही वाहनावर कारवाई झाल्याचे अद्याप निदर्शनास आलेले नाही. वाहनांना असणाऱ्या पांढऱ्या हेडलाईटमुळे पडणाऱ्या तीव प्रकाशाने डोळ्यापुढे अंधारी येते. तसेच मोतीबिंदु असणाऱ्यांनाही त्रास होतो. पांढऱ्या हेडलाईटमुळे समोरून येणारे वाहन चालक दचकतात. अशा प्रसंगी अपघात घडण्याची शक्यता अधिक असते. वाहतूक शाखेने याची गांभिर्याने दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. (शहर प्रतिनिधी)इतरांना नाहक त्रास? शहरामध्ये आलेली बाहेरील वाहने तसेच शहरामधील काही विद्यार्थी मोटार सायकलीला सर्रासपणे पांढरे हेडलाईट लावत आहेत. असे असतानाही वाहतूक शाखेकडून अद्यापही अशा कोणत्याही वाहनावर अद्याप कारवाई झाल्याचे निदर्शनास येत नाही.