शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ प्रकरणाच्या चौकशीसाठी तज्ज्ञांची समिती नियुक्त

By admin | Updated: April 29, 2016 00:37 IST

तालुक्यतील आष्टी येथील उपकेंद्रात दोन महिन्याच्या गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली.

गर्भवती महिला कुटुंब नियोजन प्रकरण : जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून कासवगतीने चौकशीतुमसर : तालुक्यतील आष्टी येथील उपकेंद्रात दोन महिन्याच्या गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रकरणी भंडारा जिल्हा आरोग्य विभागाकडून कासवगतीने चौकशी सुरू आहे. ३ मे रोजी जिल्हास्तरीय मेडिकल बोर्डाची बैठक लावण्यात आली आहे. या समितीत तज्ज्ञांचा समावेश आहे. महिन्यातून एकदा या समितीची बैठक होते, पंरतु आष्टी येथील प्रकरण गंभीर असल्याने बैठक लवकर घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली.तुमसर तालुक्यातील नाकाडोंगरी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत आष्टी उपकेंद्रात दोन महिन्याच्या गर्भवती महिलेची कुटूंब शस्त्रक्रिया करण्यात आली. महिलेच्या तपासणी सोपस्कार पार पाडल्यानंतर तालुका आरोग्य अधिकाऱ्यांनीच गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया केली. २३ एप्रिल रोजी ‘लोकमत’ने गर्भवती महिलेची कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया या शीर्षकाखाली वृत्त प्रकाशित केले होते. त्यामुळे आरोग्य विभाग खळबळून जागा झाला.२६ एप्रिलला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. देवेंद्र पातुरकर यांची भेट घेऊन आष्टी येथील प्रकरणाची चर्चा केली. ३ मे रोजी दुपारी ४ वाजता जिल्हा सामान्य रूग्णालयात जिल्हास्तरीय मेडीकल बोर्डाची बैठक निश्चित करण्यात आली या बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी, सामान्य रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकीत्सक प्रसुती तज्ज्ञ, विशेष तज्ज्ञ उपस्थित राहणार आहेत. आष्टी येथील प्रकरणाची सर्व कागदपत्रांची जुळवाजुळव करण्यात आली असून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.विजय डोईफोडे यांनी चौकशी केली आहे. संपुर्ण माहिती अहवाल मेडीकल बोर्डासमोर ठेवण्यात येणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत असल्याने आरोग्य विभाग येथे सावध पावले उचलत असल्याचे दिसून येते. वृत्त प्रकाशित झाल्यानंतर तपासणी व चौकशी येथे सुरू होती, हे विशेष. (तालुका प्रतिनिधी)