शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2016 00:24 IST

प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरणारी योजना असून या योजनेला २ आॅगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे.

२ आॅगस्टपर्यंत संधी : शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहनभंडारा : प्रधानमंत्री पिक विमा योजना जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी फायदेशिर ठरणारी योजना असून या योजनेला २ आॅगस्ट पर्यंत मुदत वाढ देण्यात आली आहे. नैसर्गिक आपत्ती, किड व रोगांमुळे पिकाचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळणार असल्यामुळे या योजनेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नलिनी भोयर यांनी केले आहे.या योजनेत पिकाच्या नुकसानीचे अत्यंत परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राहणार आहे. पिक कर्ज घेणाऱ्या इच्छुक शेतकऱ्यांनी आॅगस्ट २०१६ अखेर कर्ज घेतले असल्यास विमा प्रिमीयम रक्कम कपात करण्यात येवून सदर योजनेचा लाभ घेता येईल. शेतकऱ्यांनी २ आॅगस्टअखेर कर्ज घेण्याची कायर्वाही करावी. तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सुध्दा २ आॅगस्टपर्यंत पिक विमा काढून घेण्याची कार्यवाही करावी. खातेदारांचे व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभागी होऊ शकतात. शेतकऱ्यांना भरावयाचा विमा हप्ता हा खरीप हंगामासाठी २ टक्के व रब्बी हंगामाकरीता १.५ टक्के व नगदी पिकांसाठी ५ टक्के मर्यादित आहे आणि जोखीमस्तर सर्व पिकासाठी ७० टक्के निश्चित करण्यात आला आहे. पीक पेरणी पासून काढणीपर्यंतच्या कालावधीत नैसर्गिक आग, वीज कोसळणे, पूर, भुस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, किड व रोग इत्यादी बाबींमुळे पिकाच्या उत्पन्नात घट आल्यास विमा संरक्षण प्राप्त होईल. या योजनेअंतर्गत हवामान घटकांच्या प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे व पिकाच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकुल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान काढणी पश्चात नुकसान यास विमा संरक्षण मिळेल.जिल्ह्याकरीता भात व सोयाबिन या २ पिकांचा समावेश करण्यात आला आहे. भात पिकांसाठी विमा संरक्षित रक्कम ३९ हजार प्रति हेक्टरी व सोयाबिनसाठी ३६ हजार रुपये प्रति हेक्टरी असून शेतकऱ्यांना भात पिकाकरीता भरावयाचा पिक विमा हप्ता ७८० रुपये प्रति हेक्टरी तसेच सोयाबिनसाठी ७२० रुपये प्रति हेक्टरी भरावयाचे आहेत. बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी विमा प्रस्तावाचे आवेदन पत्र भरुन बँकेच्या स्थानिक, प्रादेशिक, प्राथमिक कृषि पत पुरवठा सहकारी संस्था, विमा कंपनीच्या अधिकृत विमा प्रतिनिधी किंवा विमा मध्यस्थामार्फत विमा हप्ता रकमेसह भरावे, असे म्हटले आहे.या योजनेत सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे कापणीनंतर शेतात वाळविण्यासाठी ठेवलेल्या पिकाचे नुकसान झाल्यास त्याबाबतची माहिती ४८ तासाच्या आत संबंधित बँक, वित्तीय संस्था, विमा कंपनी यांना देणे आवश्यक आहे. बिगर कजर्दार शेतकऱ्यांना अधिसूचित पिकासाठी एका क्षेत्रासाठी, एकाचवेळी आणि एकाच विमा कंपनीकडून विमा संरक्षण घेणे बंधनकारक आहे. शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन योजनेचा लाभ घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. (नगर प्रतिनिधी)