शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

चिमण्यांचे अस्तित्व हरविले

By admin | Updated: March 28, 2016 00:32 IST

लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये हमखास येणारे पात्र म्हणजे चिऊताई. ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना ...

आधुनिकीकरणाचा फटका : प्रदूषणामुळे घटतेय संख्याभंडारा : लहानपणी आई-आजीच्या गोष्टींमध्ये हमखास येणारे पात्र म्हणजे चिऊताई. ‘एक घास चिऊचा, एक घास काऊचा’ असे सांगताना आई अंगणात, झाडावर वावरणाऱ्या चिऊताईला सहज दाखवायची. परंतु आज ही चिऊताई दिसेनाशी झाली आहे. पूर्वी माणसांमध्ये न भिता, बिनधास्तपणे घरामध्ये इकडून-तिकडे वावरणारी चिऊताई अचानक माणसांना सोडून कुठे फुर्र झाली आहे, हे समजेनासे झाले आहे. मानवी सहवासातून गायब झालेल्या या चिमुकल्या पक्ष्याचे अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न म्हणून पर्यावरणप्रेमींनी केला. पक्षिप्रेमींनी शहरी वातावरणात चिमणीचा शोध घेतला असता तिच्या अस्तित्वाचे गंभीर संकट निदर्शनास आले. तान्ह्या बाळांना अतिशय आवडणारी चिऊताई सहज आपल्या घरात वावरायची. अंगणात धान्य निवडताना चार दाणे टाकले की चिमणीचा थवा हमखास तो टिपायला जवळ यायचा. नाही नाही म्हणता भुर्रकन उडूनही जायच्या. अंगणात, घराच्या आडोशाला, अगदी भिंतीवर टांगलेल्या फोटोंच्या मागे चिऊताईचे घरटे सहज तयार व्हायचे. आईला ‘काय स्वयंपाक केला?’ हे विचारण्यासाठी थेट स्वयंपाकघरापर्यंत चिऊताईचे अस्तित्व असायचे. मात्र या गोष्टी आता कथा- कादंबऱ्यांमध्येच दिसाव्यात अशा वाटतात. विकासाच्या हव्यासात मानवाने या पक्षी-प्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आणले आहे. घरटी बांधायला जागा नाही, जवळपास झाडे नाही, अशा परिस्थितीत त्या राहणार कुठे. त्यापेक्षा गंभीर म्हणजे शहरात वाढलेले प्रदूषण, वाहनांचा भो-भो आवाज आणि नवे संकट म्हणजे मोबाईल टॉवरचे रेडिएशन. यामुळे चिमण्यांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. शिवाय उन्हाळ्यात निर्माण होणारे जलसंकट चिमण्यांसह इतरही पक्ष्यांच्या जीवावर उठले आहे. अशा परिस्थितीत इवलीशी चिऊताई शहरात राहणार कशी? मानवी हव्यासाने जैवविविधतेचे संतुलन किती बिघडले, चिमण्यांच्या कमी झालेल्या अस्तित्वातून याचे गंभीर संकेत मिळत आहेत. चिमण्यांसोबतच अन्य पक्षांचेही अस्तित्व कमी होत चालले आहे. पर्यावरणाचे रक्षण करणे आता महत्वाचे झाले आहे. अन्यथा, अशावेळी ‘या चिमण्यांनो परत फिरारे, घराकडे..’ अशी आर्त हाक पर्यावरणप्रेमींना घालावी लागत आहे. (शहर प्रतिनिधी) सिमेंटच्या जगात आश्रयाला जागा नाहीपूर्वी ग्रामीण आणि शहरी भागात मातीच्या खापरांची घरे होती, मोठमोठे वाडे होते. हळूहळू शहरी भागातील हे वाडे, घरे जमीनदोस्त झाली. सिमेंट, काँक्रिटच्या जंगलांनी शहरे वेढली गेली. रस्त्यांवरच्या झाडांच्या कत्तली झाल्या. रस्ते उघडे झाले. सिमेंट काँक्रिटच्या वन बीएचके, टू बीएचके सदनिकात चिमण्यांना घरटी बांधायला जागाच राहिली नाही. सिमेंटच्या बंगल्यातही त्यांना आश्रय उरला नाही. परिणामी माणसांना आपला सहवास नकोसा झाला की काय, असे वाटून चिमण्यांनीही शहरातून आपले बस्तान हलविले, नव्हे घरच सोडले.