शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

मालगुजारी तलावांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: March 15, 2016 01:01 IST

जिल्हा जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर जिल्हा परिषदेच्या

भंडारा : जिल्हा जलसंकटातून मुक्त होण्यासाठी एकीकडे जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे, तर जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाच्या नियंत्रणात असलेल्या मामा तलावांचे अस्तित्व अतिक्रमणामुळे धोक्यात आले आहे. एकेकाळी बाराही महिने तुडूंब राहणारे तलाव आता केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. एवढेच नाहीतर अनेक तलाव बेपत्ता झाले आहेत. काही तलाव सोडले तर कोणत्याही तलावात पाहिजे त्या प्रमाणात पुरेसे पाणी दिसून येत नाही. जिल्ह्यात पुरातन काळापासून मालगुजारी तलाव आहेत. त्यामुळेच हा जिल्हा तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. मात्र, सध्यास्थितीत जिल्हयातील मालगुजारी तलावांची परिस्थिती पाहिली तर, हे मालगुजारी तलाव मातीने भरण्यासोबतच अतिक्रमणामुळे प्राचीन वारसाचे अस्तित्व संकटात आल्याचे दिसून येत आहे.विशेष म्हणजे जिल्हा परिषदेकडून लक्ष देण्यात न आल्यामुळे मालगुजारी तलावांचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. बांध तसेच तलाव एकतर मातीने भरण्यात आले किंवा अतिक्रमण करण्यात आले आहेत. जिल्ह्याच्या अनेक तालुक्यांमधील बोडी व तलाव मातीने बुजवून सपाट करण्यात आले. यानंतर तेथे भूखंड पाडून त्यांची विक्री सुद्धा करण्यात आली आणि त्यावर आता अनेक वसाहती तयार झालेल्या आहेत. मालगुजारी तलाव लुप्त होण्यामागील हे एक प्रमुख कारण आहे. याकडे जिल्हा परिषद प्रशासनाने विशेष लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.जिल्ह्यातील तलावांवर वाढते अतिक्रमण तसेच प्राचीन मालगुजारी तलावांकडे लक्ष न दिल्यामुळे तलावांची जलक्षमता कमी झालेली आहे. जिल्ह्यात जवळपास ६० टक्के तलाव असे आहेत, जे पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर विसंबून आहेत. अनेक तलाव तर पूर्णत: बुजून गेले व त्यांच्यावर अतिक्रमण करण्यात आले आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढील काही वर्षांत मालगुजारी तलावांचे अस्तित्वच नष्ट होईल, यात शंका नाही.मोहाडी तालुक्यातील करडी परिसर 'तलावांचा परिसर' म्हणून ओळखला जातो. वैनगंगेच्या पूर्व काठावरील शेती सुपीक असून कृषीपंपाची सोय आहे. मात्र कोका जंगल टेकड्यांच्या पायथ्यांशी असलेला मोठा परिसर तलावांच्या सिंचनावर अवलंबून आहे. संपूर्ण क्षेत्र सिंचनाने बकाल झाला आहे. केवळ खरीप पिकांपुरते पाणी साठविण्याची क्षमता येथील तलावात आहे. मात्र ते सुध्दा मिळू शकले नाही. त्यामुळे तलावांच्या पायथ्याशी शेतीमध्ये दुष्काळाच्या मोठ्या भेगा पडल्याचे दिसून येते. या परिस्थितीकडे लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे. मोहाडी तालुक्यातील करडी परिसरात देव्हाडा, मोहगाव, नवेगाव, जांभळापाणी, करडी, किसनपूर, लेंडेझरी, जांभोरा, केसलवाडा, पालोरा, खडकी, ढिवरवाडा, बोंडे, डोंगरदेव आदि तालुक्यातील गावात लहान मोठ्या तलावांची संख्या अधिक आहे. याही व्यतिरिक्त परिसराला लागून असलेल्या भंडारा जिल्ह्यातील कोका, इंजेवाडा, सर्पेवाडा, दुधारा, लोहारा, चंद्रपूर माटोरा, नवेगाव आदी गावांतही तलावाची संख्या बरीच आहे. बऱ्याच तलावांच्या गेट नादुरुस्त आहेत. तसेच तलावांच्या पाळ कमकुवत आहेत. तलाव गाळाने भरलेले असल्याने सपाट झाली आहेत. सर्व तलावांमध्ये कमीअधिक जास्त प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. त्यामुळे बऱ्याचवेळी अतिक्रमण हटविण्यासाठी आंदोलने करण्यात येतात. परंतु, काही दिवसांनी पुन्हा परिस्थिती 'जैसे-थे' राहते आणि प्रश्न मात्र कायम राहतो. (नगर प्रतिनिधी)