शहर डाकघराचा उपक्रम : शालेय विद्यार्थ्यांना मिळाली अनमोल संग्रहाची माहितीभंडारा : आधुनिक काळात मोबाईल, टेलीफोन संगणकाचा सर्वत्र वापर वाढला आहे. पूर्वीच्या काळापासून डाकघरच्या माध्यमातून एकमेकांना पत्रव्यवहार करण्यात येतो. त्याकरिता वापरण्यात येणाऱ्या डाक तिकीटांची अनेकांनी जपवणूक केली आहे. अशा तिकीटांची प्रदर्शनी भंडारा शहरात विद्यार्थ्यांकरिता लावण्यात आली. दुर्मिळ डाक तिकीटांच्या प्रदर्शनीतून अनेकांना त्याची माहिती मिळाली. शहरातील अंकुर विद्या मंदिरमध्ये त्या डाकतिकीटांचे प्रदर्शन भरविण्यात आले. या कार्यक्रमाला नागपूर ग्रामीणचे प्रवर अधिक्षक अनिल चव्हाण, भंडाराचे पोस्टमास्तर अविनाश अवचट, अंकुर विद्या मंदिरचे प्राचार्य हेमंत चांदवासकर, फिलॅटिकल ब्युरोचे जयंत खेडकर, मनोहरसिंग भारतध्वाज, अॅड. पुष्कर देशपांडे, भंडाराचे विपनन अधिकारी भोलाराम सोनकुसरे यांचे प्रामुख्याने उपस्थिती होती. फिलॅटिकल ब्युरोच्या माध्यमातून या दुर्मिळ डाक तिकीटांचे प्रदर्शन विदर्भात केवळ भंडारा शहरात प्रथमच भरविण्यात आले. या प्रदर्शनात स्वातंत्र्यपूर्व काळापूर्वीच्या तिकीटापासून सद्यास्थितीचा तिकीट ठेवण्यात आले. या तिकीटांवर स्वातंत्रपूर्व काळातील परिस्थितीची जाणीव प्रदर्शन बघायला आलेल्यांना मिळाली. डाक विभागाने आयोजित केलेल्या या दुर्मिळ तिकीट प्रदर्शनीला भंडारा शहरातून विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी भेटी दिल्या. त्यासोबतच नागरिकांनीही प्रदर्शनी बघून तिकीटांचा इतिहास जाणून घेतला. (शहर प्रतिनिधी)माय स्टॅम्पचे महत्त्वडाक विभागाने आजवर काढलेल्या तिकीटांवर व्यक्तिविशेष किंवा महत्वाच्या घडामोडींचे चित्र बघायला मिळाले. या पलिकडे जावून डाक विभागाने आता स्वत:च्या किंवा जीवलगांच्या फोटोच्या आकाराचे तिकीट काढता येण्याची सुविधा केली आहे. या प्रकाराला डाक विभागाने ‘माय स्टॅम्प’ असे नामोल्लेख केला आहे. हे तिकीट पत्रव्यवहार करण्याकरिताही उपयोगात येणार आहे. या तिकीटाचा अनोखा संग्रह म्हणून जपवणूक करता येणार आहे. माय स्टॅम्प हे ३०० रुपयामध्ये १२ मिळणार असल्याची माहिती विपणन अधिकारी भोलाराम सोनकुसरे यांनी दिली. प्रदर्शनीत अमूल्य तिकिटांचा साठा या प्रदर्शनीमध्ये रेल्वे इंजीन, प्राणी व स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यनंतरच्या परिस्थितीचे बोलके छायाचित्र असलेले तिकीट ठेवण्यात आली होती. यात १५० वर्षापूर्वीच्या तिकीटांचा समावेश होता. या तिकीटांची माहिती मिळावी याच हेतूने हे प्रदर्शन ठेवण्यात आले. यातील अनेक तिकीटांची किंमत पाच रुपयाची आहे. मात्र या तिकीटांची विक्री बंद झाल्याने आता या तिकीटांना हजारो रुपयांची किंमत आली आहे. संग्रही ठेवण्यासाठी अनेकजण याकरिता पैसे मोजतात. या तिकीट प्रदर्शनात क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांना भारतरत्न मिळाल्यानंतर काढलेल्या २५ रुपये किंमतीचा तिकीटाचाही समावेश होता.
प्रदर्शनीतून झाले दुर्मिळ डाक तिकिटांचे दर्शन
By admin | Updated: February 28, 2017 00:27 IST