शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसिद्धा प्रदर्शनीत होणार सव्वा कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 21:12 IST

महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी यासाठी स्वयंसिद्धा विभागीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात (दि.२३ ते २७ फेबु्रवारी) या कालावधीत करण्यात आले आहे.

ठळक मुद्देसीईओ सूर्यवंशी यांची माहिती : नागपूर येथे विभागीय प्रदर्शनी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तुंना बाजारपेठ मिळावी यासाठी स्वयंसिद्धा विभागीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन नागपूर येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रात (दि.२३ ते २७ फेबु्रवारी) या कालावधीत करण्यात आले आहे. या वस्तुंच्या विक्रीतून अंदाजे सव्वा कोटींची उलाढाल होईल, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांनी गुरूवारला पत्रपरिषदेत दिली.२३ फेबु्रवारी रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांच्या हस्ते या प्रदर्शनीचे उद्घाटन होईल. या प्रदर्शनीमध्ये विभागातील १७१ महिला स्वयंसहाय्यता समूहांकरीता स्टॉल तयार करण्यात आले आहे. त्यापैकी ४५ स्टॉल हे खानावळीचे तर १२६ स्टॉल हे विविध वस्तुंसाठी राहतील. भंडारा जिल्ह्यासाठी ४० स्टॉल राखीव ठेवण्यात आले असून त्यापैकी १२ स्टॉल हे जेवनाचे राहणार आहेत. प्रदर्शनीमध्ये नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नाशिक व महिला आर्थिक विकास महामंडळ नागपूरकरीता स्टॉल राखीव ठेवण्यात आले आहे.प्रदर्शनीमध्ये महिला बचतगटांनी तयार केलेले पापट, लोणचे, मुरब्बा, विविध फळांचे चिप्स, विविध सेंद्रीय खते, वनौषधी, हस्तकला, ज्वेलरी, विविध कलाकृतीचे प्रदर्शन असे एकूण ७० लक्ष रुपयांचे वस्तू व साहित्यांची विक्री केली जाणार आहे. त्यातून सव्वा कोटींची उलाढाल होणार असून महिला बचत गटांना आर्थिक उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षाही सूर्यवंशी यांनी व्यक्त केली.नागपूर येथे स्वयंसिद्धा विभागीय प्रदर्शनीचे आयोजन करण्यात आले आहे. या प्रदर्शनीच्या आयोजनाची जबाबदारी भंडारा जिल्ह्याला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या प्रदर्शनीमध्ये भेट द्यावी, असे आवाहनहे सूर्यवंशी यांनी केले. पत्रपरिषदेला अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर उपस्थित होते.