कर्तव्य : प्रवासी अडचणीतसुधन्वा चेटुले खराशी अनेकदा एस.टी. महामंडळाच्या बस चालक वाहक यांच्याबाबद वादविवादाचे चित्र आपण पहात असतो. मात्र काल हेमंत हटवार या बसचालकाने स्वत:चा जीव धोक्यात घालून प्रवाशांच्या सोयीसाठी प्रयत्न केला. भंडारा ते अर्जुनी (मोर.) या मार्गावर अड्याळ-पालांदूर मार्गे रोज धावणारी बस एमएच ४० एन ८१८३ आहे. या बसचे चालक हेमंत हटवार हे काल कर्तव्यावर असतांना अचानक तब्येत बिघडली. तरीसुध्दा त्यांनी बस चालविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या तब्येतील बिघाड जास्त असल्याने अड्याळ येथे लक्षात आले. पुन्हा आता बरे वाटते म्हणून ते बस घेऊन निघाले असता पालांदूर येथे पुन्हा तब्येत बिघडली. हटवार यांना डॉ. फरांडे यांच्या दवाखान्यात दाखल केले. त्यांच्यावर रक्तदाब वाढल्याने अशक्तपणा आल्याचे समजले. त्यांनी बसवर जाण्यास नकारही दिला मात्र महामंडळाने बसचालकाची पर्यायी व्यवस्था उपलब्ध नसल्याचे कारण देत हटवार यांनाच जाण्यासा सांगितले. आणि त्यांनी कर्तव्य म्हणून बस भंडारा येथून रवाना केली मात्र ही प्रवाशांच्या सोयीसाठी केली. कर्तव्यदक्षता हटवार यांच्या जीवावर बेतण्यास उशिर नव्हता. प्रवाशांसाठी त्याच मार्गावरुन जाणारी दुसरी बस आधार ठरली. मात्र संध्याकाळी ६ पर्यंत महामंडळाने चालकाची पर्यायी व्यवस्था केली नाही हे विशेष.
जिवाची पर्वा न करता चालविली एसटी
By admin | Updated: January 21, 2016 00:49 IST