शहरं
Join us  
Trending Stories
1
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
2
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
4
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
5
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
6
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
7
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
8
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
9
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
10
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
11
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?
12
भाजप नेत्यांना आनंदाच्या उकळ्या, शिंदेसेनेच्या राजकीय ताकदीला वेसण बसण्याची अपेक्षा
13
दोन ठाकरे एकत्र आले, आता पुढे काय होणार..?
14
मुंबई जिंकणे भाजपसाठी आव्हानात्मक ? , उद्धवसेनेचे अर्ध्याहून अधिक नगरसेवक शिंदेसेनेत गेल्यामुळे ताकद कमी झाली
15
सत्तेच्या चाव्या राज ठाकरेंच्या हाती ? शिंदेसेना, उद्धवसेना, भाजप यांना खेळवण्याची मिळू शकते संधी
16
हीच ती वेळ! अचूक टप्प्यावर 'करेक्ट कार्यक्रम' करत इंग्लंडचा 'बालेकिल्ला' जिंकण्याची संधी
17
दुधात थुंकून, तेच दूध ग्राहकांना द्यायचा; किळसवाणं कृत्य CCTV मध्ये कैद झाल्यानंतर शरीफला अटक!
18
'ज्ञानोबा माऊली तुकाराम'च्या गजरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर 
19
गैर-मुस्लिमांचे धर्मांतरण कराणाऱ्या झांगूर बाबाला अटक, मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा अन्...

इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

By admin | Updated: September 21, 2015 00:28 IST

लोकमत बाल विकास मंच, युवा नेक्स्ट व सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

घरोघरी मातीचे गणपती : दारोदारी पर्यावरण जनजागृतीभंडारा : लोकमत बाल विकास मंच, युवा नेक्स्ट व सखी मंच यांच्या संयुक्त विद्यमाने इको फ्रेन्डली गणेश स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. घरगुती गणपतीची प्रतिस्थापना करताना सदस्य व वाचकांनी स्पर्धेचे नियम लक्षात घेऊन पर्यावरण पूरक मूर्ती, मखर सजावट केली आहे. शहरातून स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दारोदारी पर्यावरण जागृती, घरोघरी मातीचे गणपती या संदेशाचे महत्व या स्पर्धेत देण्यात येत आहे.स्पर्धेत सहभागी होण्याकरिता इको फ्रेन्डली मूर्ती, मखर, सजावट व विसर्जन इत्यादीबद्दल नियम ठेवण्यात आलेले आहेत. त्यात पर्यावरण पूरक वस्तू किंवा मातीची मूर्ती, नैसर्गिक वस्तूंचे मखर सजावट व विसर्जन करतांनाही कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही. याबद्दल काळजी घ्यावयाची आहे. पहिल्या टप्प्यात पाच दिवसाच्या गणपतीचे प्रतिस्थापना करणाऱ्या स्पर्धकांकडे परीक्षकांनी प्रत्यक्ष भेट देऊन व माहिती घेऊन गुणांकन केले. यावेळी मूर्तीची घडण, रंग, सौंदर्य, मखर सजावटीत उपयोगी साहित्य यांची पाहणी करण्यात आली.त्यात पर्यावरणाला हानीकारक वस्तू उदा. थर्माकोल, प्लास्टीक व कृत्रिम वस्तूंचा वापरावर गुणही कमी करण्यात आले. विसर्जनाची माहिती घेऊन स्पर्धकांना विसर्जनाच्या योग्य पद्धतीचे मार्गदर्शनही यावेळी परीक्षकांनी केले. दुसऱ्या टप्प्यात सात व दहा दिवसाच्या घरगुती गणेशाचे परिक्षण करण्यात येणार असे बाल विकास मंच संयोजक ललित घाटबांधे यांनी कळविले. कार्यक्रमाला सौजन्य लाभलेले सखी कलेक्शनचे संचालक नितीन धकाते व लाखनीचे ओम साई रेस्टारेंटचे संचालक आशिष खराबे यांनीही स्पर्धकांचे उत्साहवर्धन केले. कार्यक्रमाला सखी मंच संयोजिका सीमा नंदनवार, युवा प्रतिनिधी स्नेहा वरकडे, सखी मंच वॉर्ड प्रतिनिधी यांचे सहकार्य मिळत आहे. (प्रतिनिधी)