शहरं
Join us  
Trending Stories
1
घरातील सर्वांचा विरोध; तरीही वैष्णवीचा लव मॅरेजसाठी हट्ट, मामाने सगळा घटनाक्रम सांगितला..
2
Vaishnavi Hagwane Case : 'वैष्णवीचे बाळ आणायला गेलो,आम्हाला बंदूक दाखवली'; मामांनी सगळंच सांगितलं
3
मानवतेचा महामेरु! पत्नी कॅन्सरने गेली, इतर रुग्णांची पैशांअभावी वणवण पाहता पतीची २० लाखांची देगणी
4
Corona Virus : बूस्टर डोस घ्यावा लागेल का? चीन आणि भारतासह ५ देशांमध्ये कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका
5
जयंत पाटलांची लागणार होती वर्णी, भाजपासोबतची बोलणी अडली; अखेर छगन भुजबळांनी संधी साधली!
6
“मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला लागा; जागावाटपाची चर्चा नको, मित्रपक्षांवर टीका टाळा”
7
नवऱ्याच्या सिनेमाच्या स्क्रीनिंगला पोहोचली अमृता खानविलकर, हिमांशुच्या 'त्या' कृतीवर खिळल्या नजरा
8
'ग्रोव'चा सामान्य गुंतवणूकदारांना धक्का? छोटे व्यवहारही होणार महाग, ब्रोकरेज शुल्क इतक्या पटींनी वाढणार
9
दिल्ली उद्ध्वस्त करण्याची योजना, रावळपिंडीत ट्रेनिंग घेतलं! आयएसआयचे दोन हेर पोलिसांच्या ताब्यात
10
Vaishnavi Hagawane Death Case : 'दाल मे कुछ काला है'; शरद पवार गटाची रूपाली चाकणकर, चित्रा वाघ यांच्यावर खरमरीत टीका
11
मोठी बातमी! अथिया शेट्टीने बॉलिवूडला ठोकला रामराम, आई झाल्यानंतर घेतला निर्णय! चाहत्यांना धक्का
12
अनिल गोटेंनी टाळे ठोकलेल्या खोलीत पैशांचे घबाड सापडले; कुलूप तोडून पोलीस आत गेले... 
13
जगभर विनाश होईल, आर्थिक मंदी येईल...; बाबा वेंगाची भयानक भाकितं, जगाचा अंतही सांगून टाकला!
14
"पती निर्दोष, दोनदा पाकिस्तानला गेला कारण..."; शहजादला अटक होताच ढसाढसा रडली रझिया
15
दीपिका पादुकोणचे नखरेच जास्त! मानधन अन् अटी ऐकून दिग्दर्शकाने 'या' सिनेमातून काढलं
16
माझे लग्न पाकिस्तानात करून द्या, ज्योती मल्होत्राची विनंती; चॅटिंग आणि डायरीच्या नोंदीतील माहिती
17
कान्समध्ये पहिल्यांदाच झळकली मराठमोळी अभिनेत्री नेहा पेंडसे, ग्लॅमरस लूकने गाजवलं रेड कार्पेट
18
Supriya Sule : "माणसं सैतानासारखी एवढी निर्दयी कशी वागू शकतात?"; सुप्रिया सुळेंनी व्यक्त केला संताप
19
अमेरिकेतून आले 'निराशेचे' संकेत! सेन्सेक्स-निफ्टी धडाम, 'या' १० शेअर्सचं सर्वाधिक नुकसान
20
दोघांच्या सहमतीनेच शरीरसंबंध घडले; बलात्कारप्रकरणातून शास्त्रज्ञाची सुटका

शिक्षण समिती सभापतीची जि.प.शाळांची पाहणी

By admin | Updated: July 3, 2014 23:25 IST

शाळेचा पहिला दिवस, शाळेत असलेली अव्यवस्था तथा यात असणारी शिक्षकांची जागृकता व जबाबदारी तपासण्यासाठी जिल्हा परिषदचे शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी चुल्हाड

चुल्हाड (सिहोरा): शाळेचा पहिला दिवस, शाळेत असलेली अव्यवस्था तथा यात असणारी शिक्षकांची जागृकता व जबाबदारी तपासण्यासाठी जिल्हा परिषदचे शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी चुल्हाड जिल्हा परिषद क्षेत्रातील शाळांना भेट देऊन आढावा घेतला.सिहोरा परिसरातील बहुतांश गावे नद्यांच्या काठावर आहेत. या गावात पुराचे पाणी शिरत असल्याने पावसाळ्यात पुरग्रस्तांची तात्पुरती सोय जिल्हा परिषद शाळा समाजमंदिर आदी इमारतीत केली जाते. याशिवाय जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सुविधा व पावसाळापूर्वी उपाययोजना हे तपासण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षण समिती सभापती रमेश पारधी यांनी शाळांना अकस्मात भेट दिली. जिल्हा परिषद शाळांची पाहणी केली तथा विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. चुल्हाड, सिंदपुरी येथील शाळेत विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण तथा शाळा परिसर स्वच्छ ठेवण्यात येत असल्याने शिक्षकांचे कौतुक केले. याशिवाय देवसर्रा येथील शाळेत अव्यवस्था दिसून आलेल्या आहेत. या शाळेत १ ते ७ तुकड्या आहेत. शाळेच्या पहिल्याच दिवशी या शाळेत विद्यार्थ्यांची अनुपस्थिती दिसून आली आहे. याशिवाय सामान्य ज्ञान सांगणारे फलकात सुधारणा करण्यात आली नाही. या फलकावर प्रधानमंत्री, खासदार यांचे नाव जुनेच दिसून आले. अन्य सामान्य ज्ञानात हाच फरक दिसून आल्याने सभापती रमेश पारधी यांनी शिक्षकांची चांगलीच क्लास घेतली. शालेय वातावरणात शिक्षकांची जबाबदारी विषयी बोधामृत पाजले. या शिवाय जिल्हा परिषद शाळेत असलेल्या स्वयंपाक गृह आणि पिण्याचे पाणी या विषयावर पारधी हे गंभीर असल्याचे दिसून आले. बहुतांश शाळेत त्यांनी याच मुद्दाची बारकाईने तपासणी केली. मध्यान्ह भोजनाचे खाद्यान्न, साहित्य याशिवाय विद्यार्थ्यांची बैठकीची व्यवस्था, पिण्याची पाण्याची स्वच्छता यांची तपासणी केली. विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शासकीय सुविधांचे दस्तऐवज तपासले. विद्यार्थ्यांच्या बाबतीत शिक्षकांकरवी होणारे हयगय खपवून घेतली जाणार नाही. शाळेत समस्या असल्यास निकाली काढण्यासाठी शिक्षण समिती, पालक-शिक्षण समिती यांच्या संयुक्त बैठकीने सोडविण्याचे निर्देश दिले. शाळेत नवीन बांधकाम, संदर्भात थेट संपर्क साधण्याची सुचना पारधी यांनी दिले. यावेळी उपशिक्षणाधिकारी आर.आर. गाढवे उपस्थित होते.सिहोरा परिसरात तीन जिल्हा परिषद क्षेत्र आहेत. यात बहुतांश गावे नदी काठावर आहेत. पावसाळ्यात पुराचे पाणी गावात शिरताच अनेक आजारांचा प्रसार होत आहे. होणाऱ्या आजारापासून सावधता बाळगण्यासाठी अंगणवाडी सेविका, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक, सरपंच, आरोग्यसेविका यांची संयुक्त आढावा बैठक घेणार आहेस. ही बैठक पावसाळापूर्वी सिहोऱ्यात आयोजित करणार असल्याची माहिती त्यांनी चर्चेदरम्यान लोकमतला दिलीे (वार्ताहर)