शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

माजी ग्रा.पं. सदस्याचा अपघाती मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2017 23:37 IST

येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शहर काँग्रेस कमेटीचे सदस्य सुशिल नामदेवराव बनकर (४२) यांचा अपघातात मृत्यू झाला.

ठळक मुद्देमुंडीपार येथील घटना : चौकशीची कुटुंबीयांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा शहर काँग्रेस कमेटीचे सदस्य सुशिल नामदेवराव बनकर (४२) यांचा अपघातात मृत्यू झाला. ही घटना काल मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली. या संदर्भात बनकर यांचा अपघातात की घातपातामुळे मृत्यू झाला असा संशय व्यक्त करून कुटुंबियांनी चौकशीची मागणी केली आहे.माहितीनुसार सुशिल बनकर यांची पत्नी भंडारा येथे नोकरी करीत असल्यामुळे सुशिल हे कुटुंबियांसह भंडारा येथे वास्तव्यास आहेत. मात्र त्यांचा व्यवसाय साकोली येथे असल्यामुळे ते दररोज भंडारा ते साकोली येणे जाणे करायचे. रोजच्या प्रमाणे सायंकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकीने साकोलीहून भंडारा येथे जाण्यासाठी निघाले. मात्र रात्री उशिरापर्यंत घरी न परतल्याने त्यांचा शोध घेण्यात आला.या दरम्यान बुधवारला सकाळी सुशिलचा मृतदेह मुंडीपार फाट्याजवळ आढळला. घटनेची माहिती मिळताच साकोली पोलीस तथा सुशिलचे कुटुंबिय घटनास्थळावर पोहचले. यावेळी सुशिलच्या डोक्यावर व उजव्या हाताखाली मार असल्याचे दिसून आले. परंतु सुशिल यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याची निश्चित माहिती कळू शकली नाही. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी साकोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. त्यांच्या पार्थिवावर कुंभली नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुशिलच्यामागे पत्नी, एक मुलगी, आई, चार भाऊ, बहिण असा आप्तपरिवार आहे. याप्रकरणी साकोली पोलिसांचा तपास सुरु झाला आहे.घातपाताची शक्यतासुशिल हा मंगळवारी सायंकाळी साकोलीहून भंडारा येथे दुचाकीने निघाला. रात्री ९ च्या सुमारास सुशिल यांचे जावई गायधने यांनी भ्रमणध्वनीवर सुशिल यांचेशी संपर्क साधला. सुशिलने लाखनी येथे आहे असे सांगितले होते. बनकर हे रात्री ९ च्या सुमारास लाखनी येथे होते तर त्यांचा मृतदेह लाखनी पूर्वी येणाºया मुंडीपार शिवारात कसा आढळला? सुशिल यांचा अपघात झाला आहे तर त्यांची दुचाकी व्यवस्थित का? असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. त्यामुळे बनकर यांचा मृत्यू घातपातामुळे तर झाला नाही ना? अशी शंका व्यक्त करून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी बनकर कुटुंबियांनी केली आहे.१० वर्षे होते ग्रामपंचायत सदस्यमनमिळावू स्वभावाचे सुशिल बनकर हे साकोली ग्रामपंचायतीचे दोन वेळा सदस्य राहिलेले आहेत. काँग्रेसचे सक्रीय सदस्यही म्हणून त्यांची ओळख होती. माजी आमदार सेवक वाघाये यांचे निकटवर्तीय म्हणूनही ते परिचित होते. त्यांच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.