शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनी एकजुटीने शाळा विकास करावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 22:08 IST

प्रगत व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिकस्तर राबविताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासह शालेय विकास गरजेचे आहे. शाळेशी संबंधित कोणतेही एक घटक शाळेचा सर्वांगीण विकास करू शकत नाही.

ठळक मुद्देस्वर्णलता घोडेस्वार : वैनगंगा विद्यालयात कार्यप्रेरणा कार्यशाळा

आॅनलाईन लोकमतपवनी : प्रगत व जलद प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र माध्यमिकस्तर राबविताना विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासासह शालेय विकास गरजेचे आहे. शाळेशी संबंधित कोणतेही एक घटक शाळेचा सर्वांगीण विकास करू शकत नाही. त्यामुळे सर्व घटकांच्या एकजुटीने शाळेचा विकास करावा, असे प्रतिपादन गट शिक्षणाधिकारी स्वर्णलता घोडेस्वार यांनी केले.वैनगंगा विद्यालय पवनीच्या डिजिटल क्लासरूममध्ये माध्यमिक शाळा मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन व विकास समिती सदस्यांसाठी कार्यपे्ररणा कार्यशाळा आयोजित करण्यात आलेली होती. कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलताना विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास हा प्रमुख ध्येय ठेवून मुख्याध्यापकांनी कार्य करावे व शाळेचा विकास साधताना सहकारी शिक्षक शाळा व्यवस्थापन व विकास समितीचे सदस्य व पालकवर्ग या सर्व घटकांना विश्वासात घ्यावे. सर्वांनी विकासासाठी एकजुटीने कार्य केल्यास शाळेचा चेहरा मोहरा बदलू शकतो, असा विश्वास व्यक्त करताना जि.प. प्राथमिक शाळा काकेपार येथील उदाहरण दिले.. विकासासाठी काम करणाºयांना प्रोत्साहन दिल्या गेले पाहिजे असे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले. याप्रसंगी न.प. प्रशासन अधिकारी अरविंद चिलबुले, वैनगंगा विद्यालयाचे प्राचार्य अनिल राऊत, विदर्भ मुख्याध्यापक संघाचे कार्याध्यक्ष अशोक पारधी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.सुलभक सुनिल मोटघरे यांनी विविध चित्रफिती द्वारे शाळा विकास कसा साधता येईल हे सोदाहरण स्पष्ट केले. प्राचार्य अनिल राऊत यांनी खाजगी शाळांचा विकास संस्था संचालकांचे अखत्यारीत असते, असे स्पष्ट केले. मुख्याध्यापक अशोक पारधी यांनी मराठी माध्यमाच्या शाळा टिकवून ठेवण्यासाठी मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासावर लक्ष केंद्रीत करावा तसेच पटसंख्या टिकवून ठेवण्यासाठी शिक्षक पालक संपर्क गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले. बी.के. मेश्राम यांनी प्रोत्साहनपर भत्ता शिष्यवृत्तीची माहिती दिली. प्रास्ताविक व संचालन सुनिल मोटघरे यांनी केले. आभार संजय नंदुरकर यांनी मानले. तंत्रस्रेही शिक्षक देवानंद घरत, दिपाली बोरीकर उपस्थित होते.