शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
4
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
5
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
6
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
7
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
8
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
9
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
10
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
11
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
12
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
13
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
14
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
15
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
16
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
17
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
18
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
19
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
20
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त

प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडावे

By admin | Updated: May 2, 2017 00:52 IST

समाजपेक्षा कुणीही मोठा नाही, समाजहित लक्षात ठेवूनही सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते.

नाना पटोले : १२ जोडपी विवाहबद्ध, कुणबी समाज सामूहिक विवाह सोहळातुमसर : समाजपेक्षा कुणीही मोठा नाही, समाजहित लक्षात ठेवूनही सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले जाते. सामूहिक विवाह सोहळ्यात भव्यदिव्यतेला फाटा बसवून आर्थिक, वेळेची बचत होते. प्रत्येकाने समाजाचे ऋण फेडावे. समाजाकडून जेव्हा गरज असते तेव्हा धावून जाणे व काम झाल्यावर त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे, मी पण मिरविणे यातून कुणी मोठा होत नाही असे प्रतिपादन खा. नाना पटोले यांनी केले.ते कुणबी समाज सेवा मंडळातर्फे आयोजित कुणबी समाज भवनात सामूहिक विवाह सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून आ. चरण वाघमारे, विधान परिषद सदस्य परिणय फुके, नगराध्यक्ष प्रदीप पडोळे, जि.प. सभापती नरेश डहारे, माजी जि.प. अध्यक्ष मनोहर सिंगनजुडे, दुग्ध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी, जि.प .सदस्य के. के. पंचबुध्दे, न.प. सभापती मेहताब सिंग ठाकुर, नगरसेवक राजू गायधने, सचिन बोपचे, सुनिल पारधी, नगरसेविका शिल्पा डोये, भारती धार्मिक, सुधाकर कारेमोरे इत्यादी उपस्थित होते.खा. नाना पटोले पुढे म्हणाले, मागील १५ दिवसापासून तुमसरात कुणबी समाजाचा सामुहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात येत आहे. यावर्षी १२ जोडपी विवाहबध्द झाली. सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन मोठ्या जिकटीचे काम आहे. पंरतु ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे काही देणे लागते. हा उद्दात्त हेतू समोर ठेवण्याची आज गरज आहे. समाजात काम करतांनी केवळ सामाजिक दृष्टीकोण समोर ठेवावा असे आवाहन त्यांनी केले. शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी जनतेकरिता तथा ओबीसी बांधवाकरिता राज्य शासनाने अडीच हजार कोटींची तरतुद केली आहे. त्याकरिता आता आपली मोठी जबाबदारी वाढली आहे. एकदिलाने जागृत होऊन कामे केली पाहिजे.विवाह सोहळ्याला आ. चरण वाघमारे, परिणय फुके, प्रदीप पडोळे सह अतिथींनी मार्गदर्शन केले. सुधाकर कहालकर, प्रा. संजय बुराडे, राजकुमार माटे, प्रास्ताविक संघाचे सचिव किशोर चौधरी तर आभार संघाचे अध्यक्ष सुर्यकांत सेलोकर यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यकारिणी सदस्य हरिभाऊ सिंगाडे, योगेश सिंगनजुडे, अशोक कुकडे, किशोर ईश्वरकर, राधेशाम हिंगे, लक्ष्मण हारगुडे, नामदेव भुते, उपेश बांते, दिलीप सार्वे, सेवक कुथे, राजेंद्र कडव, जगन वहीले, राजेंद्र ढबाले, हलमारे, उषा कुकडे, भाग्यश्री सेलोकर, अल्का सिंगाडे, वंदना चौधरी, गिता बुरडे, कुंता ईलमे, उषा बांते, मिना गाढवे, मालती कुकडे, वंदना कुकडे, सुशिला लांडगे, अनिता कडव, निलिमा ईलमे, सरिता सिंगनजुडे, संध्या बेदरकर, प्रेमलाल तुमसरे, लक्ष्मीकांत सेलोकर, धनराज चौधरी, हरिश मने, प्रा. अमृत मोहतुरे, सेवक कुथे, रामरतन खोकले, बालकदास ठवकर, आशिष कुकडे, जगन वहिले यांचेसह संघाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. नवदाम्पत्यांना अतिथींच्या हस्ते जिवनोपयोगी वस्तु भेट देण्यात आली. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी सुमारे १० हजार वऱ्हाडी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)