शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor Live Updates: PM मोदींनी घेतली राष्ट्रपतींची भेट; 'ऑपरेशन सिंदूर'ची दिली माहिती
2
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
3
भारतीय सैन्यानं कसं मोडलं दहशतवाद्यांचं कंबरडं? 'ऑपरेशन सिंदूर'चा पहिला व्हिडीओ समोर! बघाच
4
Operation Sindoor : पाकिस्तानमधील स्ट्राइकनंतर पीएम मोदींनी सैन्याचे कौतुक केले; कॅबिनेट बैठकीत काय झाले?
5
ऑपरेशन सिंदूरनंतर अमित शाहांनी बोलावली महत्वाची बैठक; या 9 राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित
6
Operation Sindoor: मोठी बातमी! जम्मू, अमृतसरसह देशातील ९ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; अनेक उड्डाणं रद्द
7
मोहिनी एकादशी: श्रीविष्णू होतील प्रसन्न, ‘असे’ करा व्रत; पाहा, मुहूर्त, महात्म्य अन् मान्यता
8
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ८ कोटींचे स्कॅल्प, ८४ लाखांचा बॉम्ब... हल्ल्यासाठी किती महागडी अस्त्र वापरली?
9
"दहशतवादाला जगात थारा नाही..."; सचिनपासून सेहवागपर्यंंत ऑपरेशन सिंदूरचं सर्वत्र कौतुक, कोण काय म्हणाले?
10
Astro Tips: बुध हा बुद्धी देणारा ग्रह, मात्र मेष आणि वृश्चिक राशीच्या बाबतीत दाखवतो वेगळेच रंग!
11
Operation Sindoor: 'आता त्यांना कुंकवाचा पराक्रम कळला असेल', अविमुक्तेश्वरानंत सरस्वतींचे विधान
12
चंद्र-केतु ग्रहण योगात मोहिनी एकादशी: ७ राशींवर लक्ष्मी नारायणाची कृपा, शुभ फले; घवघवीत यश!
13
BSNL नं आणली Mother's Day ऑफर, स्वस्त केले आपले ३ रिचार्ज प्लान्स; पाहा डिटेल्स
14
Operation Sindoor : "जे काही घडलं ते बरोबर, पहलगाममध्ये धर्म विचारणाऱ्या ४ दहशतवाद्यांचाही केला पाहिजे खात्मा"
15
विजापूरमध्ये भीषण चकमक; कर्रेगुट्टा टेकड्यांमध्ये लपलेल्या 15+ नक्षलवाद्यांचा खात्मा
16
त्यांनी महिलांना मारलं नाही पण...; पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी 'ऑपरेशन सिंदूर'वर काय म्हणाले?
17
Operation Sindoor: कित्येक निष्पापांचा जीव घेतला! आता स्वतःच्या कुटुंबाचा खात्मा झाल्यावर दहशतवादी मसूद अजहर म्हणतो...
18
Operation Sindoor : कठीणातल्या कठीण प्रदेशात हेलिकॉप्टर उडविण्याचा हातखंडा; हवाई दलाच्या व्योमिका सिंग, ज्यांनी ऑपरेशन सिंदूरची दिली माहिती
19
Operation Sindoor नंतर शेअर बाजाराबाबत मोठी अपडेट, BSE-NSE नं घेतला महत्त्वाचा निर्णय
20
“विना अपघात सेवा बजावणाऱ्या ST चालकांचा रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार”: प्रताप सरनाईक

विकासासाठी सर्वांनी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2018 22:42 IST

भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व.फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी केले.

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : सुकळीत भागवत सप्ताहाचा समारोप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भाजप सरकारच्या कार्यकाळात जिल्ह्याचा विकास खुंटलेला आहे. जिल्ह्याचा विकास ठप्प असून अनेक समस्या आ वासून उभ्या ठाकलेल्या आहेत. जिल्ह्याचा विकास करावयाचा असेल तर सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे, असे आवाहन खा.प्रफुल्ल पटेल यांनी साकोली तालुक्यातील सुकळी येथे स्व.फाल्गुनराव पटोले यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित श्रीमद् भागवत सप्ताहाच्या समारोप कार्यक्रमप्रसंगी केले.व्यासपीठावर माजी खासदार नाना पटोले, खा.मधुकर कुकडे, माजी राज्यमंत्री नाना पंचबुद्धे, बंडूभाऊ सावरबांधे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे, रामलाल चौधरी, विनोद पटोले, अविनाश वारजूरकर, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रेमसागर गणवीर, बशीर पटेल आदी उपस्थित होते.उपस्थितांच्या समोर खा.प्रफुल्ल पटेल म्हणाले की, मागील निवडणुकीदरम्यान भाजपने जनतेला खोटे आश्वासन देवून केंद्रात व राज्यात सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतर दिलेल्या आश्वासनांचा भाजप सरकारला विसर पडला. आतापर्यंत एकही आश्वासन पूर्ण केले नाही.जनतेची घोर निराशा केली. लोकांमध्ये सरकारविरोधात जनआक्रोश होता. हे नुकत्याच झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत दिसून आला. या सरकारच्या कार्यकाळात शेतकरी सुखी नाही. शेतकरी देशोधडीला लागला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. शेतकरी कर्जमाफी योजना फसवी आहे. अजूनही अनेक शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. सरकारने जे आश्वासन दिले त्या आश्वासनांची आतापर्यंत पूर्तता करण्यात आली नाही.जिल्ह्यात सिंचनाचा प्रश्न कायम आहे. रोजगाराचा प्रश्न कायम आहे. दुधाला भाव नाही. शेतमालाला भाव नाही. त्यामुळे सरकारच्या नाकर्तेपणामुळे आज शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहे. शेतकºयांमध्ये सरकारविरोधात रोष उफाळत आहे.लहान मोठ्या व्यवसायीकांचे तर कंबरडेच मोडले. जिल्ह्यातील स्थानिक नेते फक्त विकासाच्या गप्पा मारतात. प्रत्यक्ष कृती करीत नाही. शेतकऱ्यांसाठी व जिल्ह्याच्या विकासासाठी सरकारने कोणताही धोरणात्मक निर्णय घेतलेला नाही. या सरकारला घोषणा करण्याशिवाय काहीच दिसत नाही. जिल्ह्यात अनेक सिंचन प्रकल्प रखडलेले आहेत. चार वर्षात एकही सिंचन प्रकल्प मार्गी लागलेला नाही. नवीन रोजगार उपलब्ध करण्यात आलेला नाही. भेल प्रकल्पाचे काम सुरु करण्यास हे सरकार अपयशी ठरले. जनतेला कळून चुकले की भाजप सरकार ही सर्वसामान्य जनतेसाठी नसून धनाढ्यांसाठी काम करते. जर या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. असे खा. पटेल यांनी सांगितले. यावेळी नवनिर्वाचित खा.मधुकर कुकडे यांचा सत्कार करण्यात आला.