शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रनिर्मितीसाठी प्रत्येकाने मतदान करणे गरजेचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 22:34 IST

लोकशाही प्रणालीत सशक्त राष्ट्रनिमितीसाठी प्रत्येक नागरिकांनी सृजनात्मकरीत्या मतदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.

ठळक मुद्देशांतनू गोयल : भंडारा शहरात मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत वॉक फॉर वोट मॅरेथॉन, अधिकारी-कर्मचाऱ्यांची उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लोकशाही प्रणालीत सशक्त राष्ट्रनिमितीसाठी प्रत्येक नागरिकांनी सृजनात्मकरीत्या मतदान करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी केले.जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने मतदार जागृती कार्यक्रमांतर्गत वॉक फॉर वोट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीकृष्ण पांचाळ, अप्पर जिल्हाधिकारी दिलीप तलमले, अप्पर पोलीस अधिक्षक रश्मी नांदेडकर, उपजिल्हाधिकारी निवडणूक विलास ठाकरे, सुभाष भुसारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर, जिल्हा क्रीडा अधिकारी भाग्यश्री बिले, तहसिलदार अक्षय पोयाम, नगर परिषद मुख्याधिकारी ज्ञानेश्वर ढेरे प्रामुख्याने उपस्थित होते.जिल्हाधिकारी म्हणाले, आगामी लोकसभा निवडणूक पहाता मतदार जागृतीसाठी वॉक फॉर वोट मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. १८ वर्षावरील सर्व मुलामुलींनी आपले नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.शहरातील गांधी चौक येथून रॅलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी शांतनू गोयल यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. मतदार जागृतीसाठी आयोजित वॉक फॉर वोट मॅरेथॉन रॅली गांधी चौकातून प्रारंभ होऊन छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल भंडारा येथे सांगता करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार अक्षय पोयाम यांनी केले संचालन क्रीडा अधिकारी ए.बी. मरसकोल्हे केले. कार्यक्रमासाठी जिल्हा नियोजन अधिकारी नाखले, नासरे, तालुका क्रीडा अधिकारी प्रशांत दोंदल, राज्य क्रीडा मार्गदर्शक भोजराज चौधरी यांनी सहकार्य केले.सदर मॅरेथॉन रॅलीमध्ये प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, युवक, युवती, नेहरु युवा केंद्र व राष्ट्रीय सेवा योजनेचे युवक, विद्यार्थी व नागरिक मोठया संख्येने सहभागी झाले होते.