शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येकाने निरोगी शरीरासाठी देखभाल करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 21:37 IST

मानवी शरीर अमूल्य आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम पडतात. यामुळे आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. नवनवीन आजार वैद्यकीय क्षेत्रात आवाहन ठरत आहेत.

ठळक मुद्देविकास मेश्राम : वरठी येथे गोवर रुबेला लसीकरण जनजागरण मोहीम

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : मानवी शरीर अमूल्य आहे. वातावरणातील बदलामुळे मानवी शरीरावर त्याचे विपरीत परिणाम पडतात. यामुळे आजाराच्या संख्येत वाढ झाली आहे. नवनवीन आजार वैद्यकीय क्षेत्रात आवाहन ठरत आहेत. यामुळे जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाची काळजी घेणे अत्यावश्यक आहे. मुलाच्या आजाराबाबत पालकांनी सतर्क राहावे. शासन स्तरावर लहान मुलांना होणाºया आजाराबाबत उपाय व उपचार केले जातात. निरोगी शरीर हे अमूल्य दागिना असून प्रत्येकाने याची देखभाल करावी, असे प्रतिपादन प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकरी डॉ. विकास मेश्राम यांनी केले.गोवर रुबेला लसीकरण जनजागरण मोहीम अंतर्गत तथागत पब्लिक स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात पालकांना माहिती देताना ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून आरोग्य विभागाचे सुदामे, प्रा. डॉ. अश्ववीर गजभिय, प्रा. विद्या मेश्राम उपस्थित होते.यावेळी गोवर रुबेला लसीकरण कण्याचे महत्व पालकांना सांगण्यात आले. या लसीकरणाच्या माध्यमातून लहान मुलांना होणाऱ्या गंभीर आजारापासून मुक्त करण्याचे धोरण असल्याची माहिती त्यांनी दिली. शासनस्तरावर या योजनेच्या देशातील इतर राज्यात यशस्वी आयोजन झाले असून महाराष्ट्रात लवकरच नऊ महिने ते १५ वर्षाच्या मुलांना गोवर रुबेला लस देण्यात येणार आहे. पालकांनी मुलाच्या पालकत्वाची जबाबदारी म्हणून न चुकता मुलांना लस द्यावी असे आवाहन त्यांनी केले.संचालन श्रावणी मेश्राम व आभार प्रदर्शन ऋतुजा राऊत यांनी केले. यावेळी शहनाज शेख, स्वाती राघोर्ते, बबिता रहांगडाले, प्रीती काळे, मीरा चाचेरे, योगिनी लांजेवार, ज्योती बागडे, राहुल खोब्रागडे, धीरज गोडखे, पूजा बोन्द्रे, अश्विनी निमकर, गीता देशमुख उपस्थित होते.