शहरं
Join us  
Trending Stories
1
त्याच पाकिस्तानने सणसणीत वाजवली! इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाला दिला पाठिंबा, अमेरिका...
2
शिवसेनेचा बाप मीच आहे, भाजपा आमदार परिणय फुकेंचं वादग्रस्त विधान; शिंदेसेना संतप्त
3
NSDL IPO Allotment Status: NSDL आयपीओला तुफान प्रतिसाद; लेटेस्ट GMP सह जाणून घ्या कसं चेक कराल अलॉटमेंट स्टेटस?
4
झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त
5
संशयाचं भूत मानगुटीवर बसलं, सीआरपीएफच्या जवानानं पत्नीचं मुंडकं छाटलं! वृत्त वाहिनीच्या ऑफिसमध्ये गेला अन्...
6
हातखंबा येथे पुन्हा अपघात, गॅसवाहू टँकर वडापावच्या टपरीवर आदळला; ग्रामस्थांनी महामार्ग अडवला
7
भारताबाबत ट्रम्प यांनी मोठी चूक केली, दिग्गज अर्थतज्ज्ञानं साधला निशाणा; म्हणाले, "हे म्हणणं एकदम..."
8
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
9
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex १६६ आणि निफ्टी ३१ अंकांच्या तेजीसह खुला, 'हे' शेअर्स वधारले
10
समृद्धीने सुसाट निघाल तर पकडले जाल, तुमच्यावर लक्ष ठेवणार एक हजार ‘डोळे’
11
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
12
‘महादेवी’ हत्तीण प्रकरणात शासनाचा आदेश नाही, उद्या मुंबईत बैठक : मुख्यमंत्री
13
Video : ६०० वर्षांनंतर पहिल्यांदाच! भूकंपानंतर ज्वालामुखीचा उद्रेक; रशियाच्या कामचटकाचा धोका अजूनही टळेना
14
आंध्र प्रदेशातील ग्रॅनाइट खाणीत मोठी दुर्घटना, ६ स्थलांतरित कामगारांचा मृत्यू, ३ जखमी
15
पुत्रदा एकादशी-बुध प्रदोष: ८ राशींना सर्वोत्तम काळ, शुभ-लाभ; हाती पैसा राहील, कल्याण होईल!
16
सुरक्षित गुंतवणुकीसह जबरदस्त रिटर्न! कमाईची उत्तम संधी आहेत या ५ स्कीम; मिळेल ८% पेक्षा जास्त व्याज
17
वसईची भयंकर घटना, मुंबईला धोक्याची घंटा!
18
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
19
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
20
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू

‘त्या’ गावांना दरवर्षी बसतो पुराचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2017 00:25 IST

मागील आठवड्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गाढवी नदीला पूर आला. यामुळे परिसरातील शेकडो घरांची पडझड झाली.

संतोष बुकावन । लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : मागील आठवड्यात अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गाढवी नदीला पूर आला. यामुळे परिसरातील शेकडो घरांची पडझड झाली. शेकडो हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाले. या नदीला पूर येण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरवर्षी पुराचा या गावांना फटका बसतो. मात्र प्रशासनाचे उपाययोजना करण्याकडे दुर्लक्ष आहे.गाढवी नदीच्या पुरात महेंद्र तुळशीराम लांडगे हा इसम वाहून गेला. पावसाच्या पाण्याचे गाढवी नदीला पूर येणे म्हणजे आश्चर्यच. इटियाडोह धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे गाढवी नदीला येणाऱ्या पुरामुळे दरवर्षी बरीच गावे बाधित होतात. अनेक गावांना पाण्याचा वेढा होतो. त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न ऐरणीवर आहे. दरवर्षी गावातील लोकांना इतरत्र स्थलांतरित करण्याचे काम प्रशासन करते. मात्र हा प्रश्न कायम स्वरुपी मार्गी लावण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. नदी, नाल्यांचे पात्र अरुंद होत आहेत. पूर्वी मोठे असलेले प्रवाह आता लहान झाले आहेत. नदी, नाले, तलावांची पाणी सामावून घेण्याची क्षमता कमी झाली. नैसर्गिक स्त्रोतातील पाणी अंग चोरुन वाहात आहे. तलाव, नदी, ओढे, नाले पाण्याच्या प्रवाहाने बुजले आहेत. काही तर भराव टाकून बुजविले. जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा वापर करण्याची स्पर्धा आहे. मोठमोठी अतिक्रमणे नैसर्गिक संपदेवरच होत आहेत. यामुळेच पावसाचे पाणी, धरणातून नदीच्या पात्रात सोडलेले पाणी वस्ती व शेतांमध्ये वाहून जात आहे. विशेषत: हवामान बदलाचा रंग देण्याचा प्रयत्न केला जातो. पण, वास्तविकतेकडे दुर्लक्ष केले जात आहे. पुराचा फटका बसणारी गावे इटियाडोह धरणाच्या ओव्हरफ्लो झालेल्या पाण्यामुळे गाढवी नदीला पूर येतो. या पुरामुळे पुष्पनगर अ, वडेगाव बंध्या, खोळदा, बोरी ही गावे बाधित होतात. गावात पाणी शिरते. लोकांना बाहेर सुखरुप काढावे लागते. या गावांना अगदी बेटासारखे स्वरुप असते. बाहेर निघायला मार्गच नसतो. हा प्रसंगी ज्यावर्षी इडियाडोह धरण ओव्हरफ्लो होतो त्यावर्षी उद्भवतोच. पण, यंदा धरण ओव्हरफ्लो होण्यापूर्वीच पूर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.-तर गंभीर समस्या ओव्हेफ्लोचे पाणी गाढवी नदीतून वाहात असताना जर शनिवार सारखा २६५ मिमी पाऊस झाला तर या गावातील लोकांचे काय हाल होतील. याचा विचार प्रशासनाने करण्याची गरज आहे. २०१३ मध्ये बोरी गावात पुरामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा आढावा तत्कालीन आमदार व सद्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले, खा. नाना पटोले व जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला होता. तत्कालीन केंद्रिय मंत्री व खा. प्रफुल्ल पटेल यांनीही भेट दिली होती. सारी प्रशासकीय यंत्रणा त्यावेळी हलली. मात्र सुधारणा काहीच झाल्या नाहीत. त्यामुळे वेळीच याची दखल घेतली नाही तर भविष्यात त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील. इतकी भयावह परिस्थीती असताना शासन याकडे दुर्लक्ष का करीत आहे हे न सुटणारे कोडे आहे. नैसर्गिक स्त्रोतांवर अतिक्रमण गेल्या शनिवारी केशोरी परिसरात झालेल्या पावसाचे आश्चर्यच आहे. प्रतापगड व इटियाडोह धरणाच्या वर पर्वतरांगांवर ही मुसळधार पर्जन्यवृष्टी झाली. या पर्वतावरील दगडधोंडे अतितीव्र वेगाने पाण्याच्या प्रवाहात सोबत आले. नदी नाल्यांवरील अतिक्रमण व मानवी हस्तक्षेपामुळे नैसर्गिक पाण्याचे प्रवाह बदलले. गाढवी नदीसह विस्तीर्ण क्षेत्रात पसरल्यानेच ऐवढे नुकसान झाले. यापासून नागरिकांनीही बोध घेण्याची गरज आहे. नैसर्गिक स्त्रोतांवर अतिक्रमणचे प्रमाण वाढत असतानाच ग्रा.पं. व संबंधित विभागाचे अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात. गाळ काढण्याची गरजशासनाने यावर्षी तलावांच्या खोलीकरणाचे काम हाती घेतले आहे. नदी नाल्यांचा यात समावेश नाही. नदी, नाल्यांतही प्रचंड गाळ आहे व पात्र अरुंद झाले आहेत. यामुळे नैसर्गिक पाणी वाहून जाण्याचे प्रवाहच नष्ट झाले आहेत. त्यामुळेच गाव व शेतात पाणी शिरते. तलाव खोलीकरणाचे शासनाला उशिरा का होईना मात्र शहाणपण सूचले. तसेच नदी, नाल्याकडे लक्ष दिले पाहिजे. शासनाकडून नदी, नाल्यांवर बांधकाम केले जाते. त्यावेळी निघालेल्या जुन्या कामाचा मलबा तसाच पडून असतो. त्यामुळे पाईप बुजणे अथवा नैसर्गिक प्रवाहाच्या ठिकाणी अडथळा निर्माण होतो.