शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरात अतिक्रमण निर्मूलन मोहीम

By admin | Updated: July 1, 2017 00:24 IST

तुमसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणावर बुलडोजर फिरविण्यात आला. शुक्रवारी भाजी बाजार, लिंबू चाळ, फ्रुट मार्केट, जुने गंज बाजार परिसरातील भागातील दुकानासमोरील अतिक्रमण काढण्यात आले.

दुसऱ्या दिवशीही कारवाई : टॉकीजसमोरचे अतिक्रमण काढण्याची शिवसेनेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : तुमसरात सलग दुसऱ्या दिवशी अतिक्रमणावर बुलडोजर फिरविण्यात आला. शुक्रवारी भाजी बाजार, लिंबू चाळ, फ्रुट मार्केट, जुने गंज बाजार परिसरातील भागातील दुकानासमोरील अतिक्रमण काढण्यात आले. शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यातील अवैध बांधकाम व अतिक्रमणावर नगरपरिषद प्रशासनाने कारवाई केली. लहान दुकानदारात या कारवाईबद्दल रोष व्याप्त आहे.गुरुवारी अतिक्रमण कारवाई सुरु करण्यात आली होती. तुमसर शहरात अवैध बांधकाम व अतिक्रमण फोफावले आहे. नागरिकांना रस्त्यावरुन चालतांनी याचा फटका बसत होता. अनेक दुकाने रस्त्यावर आल्यासारखी भासत होती. मुख्य बाजारपेठेत अतिक्रमण तथा अवैध बांधकामांने कहरच केला होता. नगरपरिषदेसमोरील बुक डेपो, कपडा चाळ, शहीद स्मारकाशेजारील लहान दुकाने गुरुवारी हटविण्यात आली.शुक्रवारी हा बुलडोजर फ्रुट मार्केट समोरील दुकाने, फ्रुट मार्केट परिसर, लिंबू चाळ व भाजी बाजारावर चालला या परिसरात सर्व फुटपाथ दुकाने आहेत. या कारवाईमुळे लहान दुकानदारांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. येथे नगरपरिषद प्रशासनाने त्यांना जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे. अतिक्रमणधारकांनी सर्वांना समान न्यायाने कारवाई करण्याची मागणी केली आहे. तुमसर शहरात मेन रोड, सराफा गल्लीतील अतिक्रमण काढावे अशी मागणी जोर धरीत आहे.शहरात मंगळवारचा आठवडी बाजार रस्त्यावर भरतो. आठवडी बाजाराकरीता जागेचा शोध नगरपरिषद प्रशासनाने घेण्याची गरज आहे. जीव धोक्यात घालून भाजी विक्रेते व ग्राहक येथे बाजार करतांनी दिसतात. मागील अनेक वर्षांपासून ही समस्या कायम आहे. अतिक्रमण काढल्यानंतर नाली व रस्ते तयार करण्याची गरज आहे. दरम्यान मागील दोन दिवसांपासून तुमसरातील बाजारात अतिक्रमण निर्मुलनाची मोहीम पालिकाप्रशासन राबवित असली तरी ही मोहिम दरवर्षीप्रमाणे नाममात्र ठरावी काय? अशी चर्चा तुमसरवासीयांमध्ये सुरु झाली आहे. लक्षावधींचा खर्च करुन मोहीम राबविली जाते. मात्र बांधकामासाठी निधीचा वाणवा असल्याची बाब नेहमी सांगितली जाते.मुख्याधिकाऱ्यांना शिवसेनेचे निवेदनतुमसर शहरातील श्रीराम टॉकीज समोरील जागा अनेक वर्षांपासून राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकांसाठी प्रस्तावित करण्यात आली होती. सध्या त्या जागेवर अतिक्रमण करण्यात आले. येथील अतिक्रमण हटविण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख राजेंद्र पटले यांच्या नेतृत्वात उपजिल्हा प्रमुख सुधाकर कारेमोरे, अमित मेश्राम, जगदीश त्रिभूवनकर, नितीन सेलोकर सह पदाधिकाऱ्यांनी मुख्याधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.