शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

कधी संपणार ‘रेफर टू भंडारा’चे ग्रहण?

By admin | Updated: December 24, 2014 22:55 IST

तालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय केवळ एका डॉक्टरच्या भरोशावर चालत असून मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो.

राजू बांते/सिराज शेख - मोहाडीतालुक्यातील एकमेव ग्रामीण रुग्णालय केवळ एका डॉक्टरच्या भरोशावर चालत असून मोठ्या आशेने येथे आलेल्या रुग्णांची हेळसांड होत आहे. शेवटी त्यांना खासगी डॉक्टरांची सेवा घेतल्याशिवाय मार्ग नसतो. याशिवाय वैद्यकीय चाचणीसाठी डॉक्टर नसल्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागते. याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरज बळावली आहे.मोहाडी तालुक्यात मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालय हाच एकमेव मोठा दवाखाना आहे. तालुक्यातील ७० हजार गरीब व सामान्य परिवारातील नागरिक या रुग्णालयावर आश्रीत आहेत. तालुक्यात पाच वर्षापासून ते ८० ते ९० वर्षापर्यंतचे दोन लाख नागरिक आहेत. त्यापैकी ७० ते ८० हजार नागरिकांचा थेट संबंध मोहाडीच्या ग्रामीण रुग्णालयाशी येतो. मोहाडी ग्रामीण रुग्णालय ३० खाटांचा अत्याधुनिक पद्धतीचा आहे. मात्र या रुग्णालयात मागील आठ वर्षापासून वैद्यकीय अधीक्षक पद रिक्त आहे. अधिपरिचारिकेच्या दोन जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञाची एक जागा व सफाई कर्मचाऱ्याची एक जागा रिक्त आहे. अनेक दिवसापासून एम.बी.बी.एस. डॉक्टरांच्या तीन जागा रिक्त आहेत. सध्या या रुग्णालयात केवळ एकच एम.बी.बी.एस. डॉक्टर असून त्यांच्याकडे वैद्यकीय अधीक्षकाचा प्रभार देण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्या कामाचा ताण वाढलेला आहे. त्यामुळे दररोज बाहेरुन येणाऱ्या रुग्णांना एक होमीओपॅथी डॉक्टराकडून तपासून घ्यावे लागते. या रुग्णालयात आधुनिक प्रकारचे शस्त्रक्रिया कक्ष आहे. मात्र प्रशिक्षित आणि तज्ज्ञ डॉक्टर नसल्यामुळे हा शस्त्रक्रिया कक्ष असून नसल्यासारखा विनाकामाचा ठरत आहे. या कक्षाचा उपयोग कधी कधी कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी केले जाते. डॉक्टरांच्या रिक्त जागेमुळे येथे प्रसुतीसुद्धा करण्यात येत नाही. या ग्रामीण रुग्णालयात नेहमी ‘रेफर टू भंडारा’ हेच वाक्य रुग्णांच्या कानी पडते. ग्रामीण भागातून प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठविण्यात आलेल्या रुग्णांना व गरोदर महिलेला पुन्हा भंडाऱ्याच्या रुग्णालयात पाठविण्यात येत असते. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथे एकच एम.बी.बी.एस. डॉक्टर असल्याने त्यांच्याकडे रुग्णालयाचा संपूर्ण कारभार आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अंतर्गत पूर्वी येथे चार डॉक्टर होते. मात्र आता फक्त एकच होमीयोपॅथी डॉक्टर सोनवाने आहेत आणि त्यांनाच दररोज संपूर्ण रुग्णांची तपासणी करावी लागते. या रुग्णालयात दररोज १५० ते २०० रुग्ण विविध आजारासंबंधाने येतात. मात्र एकच डॉक्टर असल्याने काहींना तसेच परत जावे लागत असल्याचे दिसून येत आहे.