शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

अखेर व्यवस्थापकासह ग्रेडरवर गुन्हा दाखल

By admin | Updated: December 9, 2015 00:42 IST

तुमसर येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने सिहोरा परिसरातील हरदोली गावात धान खरेदी केंद्रावर गेल्या वर्षातील अतिरिक्त धान्य साठा ...

खरेदी विक्री संस्थेतील प्रकरण : साठवणूक करणे आले अंगलटचुल्हाड (सिहोरा) : तुमसर येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेच्या वतीने सिहोरा परिसरातील हरदोली गावात धान खरेदी केंद्रावर गेल्या वर्षातील अतिरिक्त धान्य साठा नायब तहसिलदारांच्या धाडीत सापडून आल्याने या प्रकरणात सिहोरा पोलीस ठाण्यात आज मंगळवारी दुपारी १२ वाजताच्या सुमारास व्यवस्थापक व ग्रेडरवर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. एस.आर. गौतम (व्यवस्थापक) व डी.एम. रहांगडाले (ग्रेडर) अशी गुन्हा दाखल केलेल्याची नोंद आहेत. या घटनेमुळे परिसरातील साठेबाजी करणाऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे.तुमसर येथील खरेदी विक्री सहकारी संस्थेमार्फत तुमसर बपेरा राज्य मार्गावरील हरदोली गावात शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र सन २०१४ मध्ये सुरू करण्यात आले होते. या केंद्रावर व्यवस्थापक व ग्रेडर यांचे संगनमताने शेतकऱ्यांच्या धान खरेदीत आलबेल करण्यात येत होते. क्विंटलमागे अतिरिक्त पोत्याच्या वजनमापीच्या नावावर एक ते दोन किलो धान्य शेतकऱ्यावरून वसुल करण्यात येत होते, असे एकूण ३३६ कट्टे धानाचे साठवणूक करून गोडावूनमध्ये नियमबाह्यरित्या ठेवण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या हक्काच्या धानातून अवैधरित्या साठेबाजी करून पैसे कमविण्याचा प्रयत्न व्यवस्थापक आणि ग्रेडर नी सुरू केल्याची तक्रार तुमसरच्या तहसिलदारांना करण्यात आली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने तहसिलदार व नायब तहसिलदार यांच्या पथकाने हरदोली येथील अनाधिकृतरित्या धान्याच्या साठेबाजी आलेल्या गोडावूनवर धाड टाकली होती. या धाडीत अवैधरित्या धान्याच्या साठेबाजी करण्यात आलेले धानाचे कट्टे पथकाने व्यवस्थापक व गे्रडर यांना सुपूर्दनाम्यावर दिले नसताना जप्तीच्या धान्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न व्यवस्थापक व ग्रेडर ने केला असल्याचे नायब तहसिलदारांच्या निदर्शनास आले आहे. शासकीय जप्तीच्या धान्याची अफरातफर केल्याप्रकरणी नायब तहसिलदार सिहोरा सर्कल निलेश प्रकाश शेंडे यांनी सिहोरा पोलीस ठाण्यात व्यवस्थापक एस.आर. गौतम व ग्रेडर डी.एम. रहांगडाले यांच्या विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी भादवी कलम ४०९, १८८, ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.