अड्याळ येथील तात्पुरते बसस्थानकअड्याळ : अड्याळ येथील मुख्य मार्गावर असलेले बसस्थानक वाहतुकीला अडथळा निर्माण करणारे ठरल्याने ते पाडण्यात आले. त्यानंतर येथे तात्पुरती सोय म्हणून तंबू ठोकण्यात आला. मात्र पावसाळ्यात विद्यार्थ्यांसह प्रवाशांचे बेहाल होत असल्याचे वृत्त लोकमतमध्ये प्रकाशित झाले. यामुळे सामाजिक कार्यकर्त्यानी पुढाकार घेऊन यावर ताडपत्रीचे आच्छादन घातले.पवनी-भंडारा राज्य मार्गावर अड्याळ येथील बसस्थानक मागील अनेक वर्षांपासून होते. कालांतराने गावाची लोकसंख्या व या मार्गावरून वाढलेली वर्दळ यामुळे सदर बसस्थानकाचा अडथळा निर्माण होत होता. ही बाब लक्षात घेवून ग्रामपंचायत प्रशासनाने रस्त्यावर असलेले बसस्थानक जमिनदोस्त केले. त्यानंतर पावसाळा सुरू होण्यापुर्वी तात्पुरता तंबू वजा शेड उभारण्यात आला. केवळ उन्हापासून बचाव होण्यासाठी ही उपाययोजना असली तरी प्रवाशांसाठी इथे अन्य कुठलीही व्यवस्था नव्हती. त्यात भरीस भर म्हणून पावसाळ्याच्या पहिल्याच पावसात या तंबूतून पाऊस पुर्णपणे खाली बसलेल्या प्रवाशांच्या अंगावर पडत असल्याने प्रवाशांना ओले होवूनच समोरील प्रवास करावा लागत होता.या बसस्थानकाच्या दुरव्यवस्थेसंबंधी लोकमतमध्ये वृत्त लावून धरले. याची दखल घेत गावातील देवेंद्र हजारे यांनी ताळपत्री दिली. तर शेतकरी संघटनेचे किशोर पंचभाई यांनी स्वखर्चातून टिनाचे शेड उभारण्यासाठी मदत केली. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रवाशांना बसण्याकरीता सिमेंटचे आसन दिले. मुनीर शेख व त्यांच्या सहकार्यांनी हे शेड उभारण्यासाठी श्रमदान व अन्य प्रकारची मदत केली. या पुढाकारातून उभारण्यात आलेले बसस्थानक आता तात्पुरते का होई ना विद्यार्थी व प्रवाशांसाठी सोयीचे झाले आहे. विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्त्यांचे आभारही मानले. (वार्ताहर)
अखेर तंबूच्या बसस्थानकाची गळती थांबविली
By admin | Updated: July 21, 2016 00:28 IST